प्रसिद्ध दिग्दर्शक-गायकाच्या प्रेमात आहे क्रिकेटपटू स्मृती मंधाना

03 Nov 2025 17:35:44

मुंबई : २ नोव्हेंबर रोजी भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत सामना जिंकून मोठी विजय मिळवला आहे. या विजयानंतर भारतीय महिला क्रिकेट संघा पलाश मुच्छलचं देशभरातून कौतुक होत आहे. क्रिकेटपटू स्मृती मंधानासह सगळ्याच महिला क्रिकेटपटूंवर कौतुकाचा वर्षाव होतोय. पण स्मृती गेले काही दिवस वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. ते म्हणजे तिच्या प्रियकराममुळे. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर आता स्मृती मंधानासोबतच तिच्या बॉयफ्रेंडचीही सगळीकडे चर्चा चालू आहे. तिचा बॉयफ्रेंड नक्की आहे तरी कोण आहे? स्मृतीच्या बॉयफ्रेंडचं नाव पलाश मुच्छल आहे.

पलाश आणि स्मृती मागच्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. तर मागच्या काही महिन्यांत त्यांनी प्रेमाची कबूलीसुद्धा दिली आहे. पलाश मुच्छल एक प्रसिद्ध संगीतकार, गायक आणि चित्रपट निर्माता आहे. तर प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचा तो भाऊ आहे. मिळालेल्या माहितीनुसार २०१९ पासून स्मृती आणि पलाश एकमेकांच्या प्रेमात आहेत. जुलै २०२४ मध्ये आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत असे स्मृती तसेच पलाश यांनी त्यांच्या चाहत्यांना सांगितले होते.

दरम्यान, पलाश आणि स्मृतीची प्रेमकाहाणीसुद्धा खूपच खास आहे. क्रिकेटपटू असलेल्या स्मृतीचे लाखो चाहते आहेत. पण स्मृती संगीतकार, दिग्दर्शक असलेल्या पलाशच्या प्रेमात पडली. ऑक्टोबर २०२५ ला इंदौरमध्ये एक खासगी पार्टीमध्ये पलाशने स्मृतीसोबत लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत दिले होते. संगीताची मोठी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात पलाश मुच्छलचा जन्म झालेला आहे. पलाशने भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेले आहे. सोबतच तो देश-विदेशात चॅरिटी शो करतो. पार्टी तो बनती है, तू ही है आशिकी या गाण्यांसाठी पलाशला ओळखले जाते. तू जो कहे, निशा आणि फॅन्स नही फ्रेण्ड्स यासारखे म्युझिक व्हिडीओंचीही त्याने निर्मिती केलेली आहे. त्याने काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केलेले आहे. अभिनेता म्हणूनही खेलें हम जी जान या चित्रपटात काम केलेले आहे.

पलाशची संपत्तीही मोठी आहे. तर सोशल मीडियावरही त्याची लाखोंची फॅनफॉलोईंग आहे. बॉलिवुड शादी या संकेतस्थळानुसार पलाशची एकूण संपत्ती ३० ते ४० कोटी रुपये आहे. पलाशचा जन्म २२ मे १९९५ रोजी झालेला आहे. तो मुळचा मध्य प्रदेशातील इंदौर येथील रहिवासी आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने विजय मिळवताच त्याने स्मृती मंधानासोबतचे काही फोटो शेअर केले होते. सोबतच त्याने भारताची विजयी ट्रॉफी हातात घेऊन भारतीय संघाचे अभिनंदन केले होते. याशिवाय वेळोवेळी तो स्मृतीसोबतचे फोटोसुद्धा शेअर करत असतो.


Powered By Sangraha 9.0