Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्राचे पप्पू कोण हे सर्वाना माहित आहे, निवडणूक यादीतील दुबार नावे डिलीट करा

03 Nov 2025 18:22:20
Chandrashekhar Bawankule
 
नागपूर : (Chandrashekhar Bawankule) उद्धव ठाकरे यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते केवळ कारणे शोधत आहेत. त्यांच्या खासदारांनी सुद्धा चुकीच्या मतदार यादीवरून निवडणूक जिंकली, ते मतचोरी करून जिंकले. आता मात्र भाजपवर टीका करत आहेत. अशीच जर मानसिकता त्यांनी कायम ठेवली, तर पुढील २५ वर्ष महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येऊ शकणार नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केले.
 
राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी बावनकुळे यांनी निवडणूक यादीतील अनियमिततेबाबत गंभीर आरोप केले. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांचे म्हणणं पूर्णपणे बरोबर आहे. उध्दव ठाकरे स्वता राहुल गांधीच्या भूमिकेत आहे. राहुल गांधीचे, कॉंग्रेसचे लांगुलचालन करणारे खरे महाराष्ट्राचे पप्पू कोण हे सर्वाना माहित आहे. कामठी, मालेगाव आणि सिल्लोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुबार आणि तिबार मतदार आहेत, काही ठिकाणी चार-चार, पाच-पाच नावे एका कुटुंबात आहेत, असे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले.
 
हेही वाचा :  Mangal Prabhat Lodha : गावदेवीच्या शारदा मंदिर शाळेत राष्ट्रभक्तीचा जागर
 
कामठीत सुमारे आठ हजार, सिल्लोडमध्ये ८९०, आणि मालेगावात सुमारे १३० मतदारांची नावे दुबार आहेत. या संदर्भात आम्ही यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. एडिशन होतं पण डिलीट होत नाही, हा मुख्य प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनीही या संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली होती असेही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
 
शेतकरी मदत आणि पीकविमा तपासणी
 
नरखेड येथील व्हायरल ऑडिओ संदर्भात बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, त्याची चौकशी २४ तासांत होईल. यामध्ये जर कोणी दोषी आढळला तर कठोर कारवाई केली जाईल. पीक विम्यासाठी २ ते ५ रुपयांचे चेक दिल्याची माहिती तपासत आहोत. जुने चेक दाखवून भ्रामक माहिती देण्यात आली का, हेही तपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
 
पक्षप्रवेश आणि काँग्रेसवर टीका
 
“ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवार यांचे कार्यकर्ते भाजपात दाखल झाले आहेत. नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू आहेत. काँग्रेसमध्ये आता कोणी राहायला तयार नाही. नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यात अंतर्गत मतभेद आहेत. दिवसभर ते शेख चिल्लीसारखे ओरडत असतात, त्यांच्या सोबत कोणी राहायला तयार नाही, असे ते म्हणाले.
 
हे वाचलात का ? : प्रसिद्ध दिग्दर्शक-गायकाच्या प्रेमात आहे क्रिकेटपटू स्मृती मंधाना
 
सरकारी बंगले आणि टॉवर प्रस्ताव
 
सरकारी बंगले जुने झाले आहेत. त्यामुळे वारंवार दुरुस्तीसाठी उधळपट्टी होते. नागपुरात मंत्री व अधिकाऱ्यांसाठी दोन नवीन टॉवर उभारण्याचा विचार आहे. हेरिटेज नसलेल्या जागी हाय-राईज टॉवर उभारण्याची योजना आहे. रवी भवन नागपूरबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांकडे प्रेझेंटेशन सादर करू,” अशी माहिती बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली.
 
कंत्राटदार आंदोलन आणि हिवाळी अधिवेशन
 
कंत्राटदारांनी कामे सुरू ठेवावीत. त्यांचे पैसे लवकरच दिले जाईल. नागपुरातच हिवाळी अधिवेशन होणार असून त्यासाठी सर्व तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0