नागपूर : (Chandrashekhar Bawankule) गेल्या एका वर्षात नागपूर शहर आणि जिल्ह्यात तब्बल ५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू केली असून, दिलेली आश्वासने पूर्णत्वास नेण्याच्या दिशेने आपण वेगाने वाटचाल करत असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली .
राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी सवांद साधला. नागपूरमधील विकास योजनांचा आढावा त्यांनी सांगितले, एनएमआरडीएच्या हद्दीत साडेसहाशे गावे येतात. सध्या मनपाची बस सेवा शहरातील २० किमी परिघात सुरू आहे, त्यापुढील भागासाठी एनएमआरडीए परिवहन सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे.
हेही वाचा : फर्जी ‘फाल्कन्स’ची कबुतरबाजी...
राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ३२ हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर करण्यात आले असून त्यापैकी ८ हजार कोटी रुपयांहून अधिक निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. नागपूर शहरात पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी ४५० कोटींचा निधी मिळाला आहे. सर्व शेतकऱ्यांना मदत पोहोचवली जाईल. ज्या शेतकऱ्यांचे केवायसी झालेले नाही, त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनाही निधी मिळेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महायुती आमदार निधीवाटपावर स्पष्टता
जळगावचे आमदार किशोर पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, महायुती समन्वय समितीच्या निर्णयानुसार, ज्यांना मागील वर्षी निधी मिळाला आहे, त्यांनी आधी जुनी कामे पूर्ण करावीत. नव्याने निवडून आलेल्या आमदारांना यंदा निधी देण्यात येणार आहे.”
हे वाचलात का ? : त्रिपुरारी पौर्णिमेला आकाशात होणार 'सुपर मून' चे दर्शन
उद्धव ठाकरेंवर तीव्र टीका
उद्धव ठाकरे यांच्या पूजेवरील वक्तव्यावर निशाणा साधताना बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, देवापुढे नतमस्तक होणे योग्य आहे, पण निवडून आल्यानंतर देव आणि जनतेला विसरणे ही उद्धव ठाकरेंची सवय आहे. मुंबईत ४० वर्ष सत्ता असूनही त्यांनी लोकांना विसरले. कोरोनाच्या काळात गणेश मंडळांना त्रास दिला. धर्म आणि जनतेच्या विरोधात काम करणारे ठाकरेच होते,अशी टीका त्यांनी केली.
वळसे पाटील यांच्या निवडणूक अंदाजावर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, ते फक्त अंदाज व्यक्त करत आहेत; निवडणूक तारीख जाहीर करण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच आहे. शंभूराज देसाई यांच्या विधानाबाबत ते म्हणाले, शिवसैनिकांना त्रास झाल्यास आम्ही शांत बसणार नाही, हे वक्तव्य त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी आहे.
रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, बर्वे दीड वर्षापूर्वी निवडून आले आहेत, पण ज्या भागाचा ते मुद्दा मांडत आहेत त्या गल्ल्या सुद्धा त्यांना ठाऊक नाहीत. त्यांचे विधान हे पूर्णपणे राजकीय आहे.