All India Seafarers and General Workers Union : परदेशात जाणाऱ्या भारतीय खलाशांची प्रक्रिया वेगवान

Total Views |
All India Seafarers and General Workers Union
 
मुंबई : (All India Seafarers and General Workers Union) 'ऑल इंडिया सीफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन'च्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर मुंबई विमानतळावर नाविकांसाठी स्वतंत्र इमिग्रेशन काउंटर सुरू करण्यात आला आहे.
 
याचा उद्देश भारतातील समुद्री क्षेत्रातील फसवणूक रोखणे आणि परदेशात जाणाऱ्या भारतीय खलाशांना सुलभ, सुरक्षित आणि वेगवान प्रक्रिया उपलब्ध करून देणे हा आहे. या संदर्भात युनियनने २७ डिसेंबर २०२३ रोजी गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखालील ब्युरो ऑफ इमिग्रेशन यांना पत्र देऊन विनंती केली होती की, सर्व भारतीय विमानतळांवर खलाशांसाठी स्वतंत्र इमिग्रेशन (All India Seafarers and General Workers Union) विभाग सुरू करावा.
 
हेही वाचा :  Love Jihad : ऑक्टोबर महिन्यात लव्ह जिहादच्या तब्बल १९ प्रकरणांची नोंद
 
युनियनने नमूद केले होते की, अनेक देशांमध्ये सिंगापूर, मलेशिया, इजिप्त, चीन इत्यादी ठिकाणी खलाशांसाठी स्वतंत्र इमिग्रेशन (All India Seafarers and General Workers Union) विभाग कार्यरत आहे. त्यामुळे फसवणूक थांबविणे आणि योग्य कागदपत्रांसह खलाशांचा प्रवास सुनिश्चित करणे शक्य झाले आहे. आता भारतात मुंबई विमानतळावर ही प्रक्रिया सुरू झाल्यामुळे भारतीय खलाशांना मोठा दिलासा मिळणार असून, युनियन लवकरच सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर हा उपक्रम लागू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा निर्णय भारतीय समुद्री उद्योगासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे, अशी भावना युनियनने व्यक्त केली आहे.
 
सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर हा उपक्रम लागू करण्यासाठी आग्रही
 
अनेक देशांमध्ये सिंगापूर, मलेशिया, इजिप्त, चीन इत्यादी ठिकाणी – खलाशांसाठी स्वतंत्र इमिग्रेशन (All India Seafarers and General Workers Union) विभाग कार्यरत आहे. त्यामुळे फसवणूक थांबविणे आणि योग्य कागदपत्रांसह खलाशांचा प्रवास सुनिश्चित करणे शक्य झाले आहे. आता भारतात मुंबई विमानतळावर ही प्रक्रिया सुरू झाल्यामुळे भारतीय खलाशांना मोठा दिलासा मिळणार असून, युनियन लवकरच सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर हा उपक्रम लागू करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- संजय पवार, अध्यक्ष, ऑल इंडिया सीफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.