मुंबई : (UAE visa) युएईने बहुतेक पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा (UAE visa) देणे बंद केले आहे आणि पाकिस्तानी पासपोर्टवर जवळजवळ बंदी घातली आहे. माध्यमांवरून मिळत असलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी अर्जदार मोठ्याप्रमाणात 'गुन्हेगारी कारवायांमध्ये' सामील होत असल्याच्या चिंतेमुळे युएईने हा निर्णय घेतला आहे. अनेक पाकिस्तानी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात व्हिसा (UAE visa) नाकारल्याची तक्रार केल्यानंतर आता ही बाब समोर आली आहे.
हेही वाचा : Satara Literary Conference : साताऱ्याच्या साहित्य संमेलनात पहिल्यांदाच होणार ५ ब्रेल लिपीतील पुस्तकांचे प्रकाशन
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्याने आता कबूल केले आहे की हे पाऊल पश्चिम आशियाई देशात प्रवास करणाऱ्या पाकिस्तानी लोकांच्या आणि "गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी होण्याच्या" चिंतेशी जोडलेले आहे. त्यासोबतच, अहवालात म्हटले आहे की युएईने (UAE visa) शंकास्पद शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रांवर चिंता व्यक्त केली आहे, तसेच काही व्हिसा अर्जदारांना गुन्हेगारी प्रकरणांशी जोडल्याच्या वाढत्या घटनांबद्दल देखील चिंता व्यक्त केली आहे. (UAE visa)
हे वाचलात का ?: Ramdas Athawale : कुणाच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
दरम्यान, द डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे अतिरिक्त गृह सचिव सलमान चौधरी यांनी सिनेटच्या मानवाधिकार कार्यात्मक समितीला दिलेल्या माहितीत सांगितले की, सौदी अरेबिया आणि युएई (UAE visa) हे दोन्ही देश पाकिस्तानी पासपोर्टवर औपचारिक बंदी घालण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. युएईमधील (UAE visa) माजी पाकिस्तानी राजदूत फैसल नियाज तिर्मिझी यांनी देखील व्हिसा नाकारणे ही अत्यंत गंभीर समस्या असल्याचे म्हटले आहे. (UAE visa)