मुंबई : (Sanjay Upadhyay) बोरीवली विधानसभेचे भाजप आमदार संजय उपाध्याय (Sanjay Upadhyay) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयात हे धमकीचे पत्र आल्याची माहिती आहे. (Sanjay Upadhyay)
याबाबत एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आ. संजय उपाध्याय (Sanjay Upadhyay) म्हणाले की, "काल दुपारी माझ्या कार्यालयात पोस्टमन एक पत्र देऊन गेला. त्या पत्रावर प्रेषक म्हणून ‘संजय पत्रकार’ असे नमूद केले होते. हे पत्र मला एका धोक्याची सूचना देण्यासाठी पाठवण्यात आले होते. हे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचे मी मनापासून आभार मानतो. त्या पत्रात काही व्यक्तींची नावे देऊन माझ्यावर आणि माझे सहकारी सुशील सिंह यांच्यावर हल्ल्याची योजना आखली जात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ही संपूर्ण माहिती मी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असून, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे." (Sanjay Upadhyay)
यापूर्वीही झाला होता हल्ल्याचा प्रयत्न
"यापूर्वीही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी पोलिसांनी तत्काळ कारवाई केली होती. एकद एक पत्रकार माझी मुलाखत घेत असताना, मुलाखत संपताच त्या पत्रकारालाही ‘त्याचा बाईट का घेतलास? तुला आणि त्याला दोघांना संपवून टाकू’ अशा स्वरुपाच्या धमक्या देण्यात आल्या. आता ही अशी तिसरी घटना आहे. जर कुणाला वाटत असेल की, अशा धमक्या देऊन मला माझ्या कामापासून थांबवता येईल, तर त्यांना स्पष्ट सांगू इच्छितो की, यापुढे या गोष्टींना आणखी कठोर आणि तत्परपणे तोंड दिले जाईल. मी मुंबई पोलिस आयुक्तांना याबाबत पत्र पाठवले आहे आणि लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या घटनेची तसेच आधीच्या घटनांची संपूर्ण माहिती देणार आहे," असेही संजय उपाध्याय यांनी सांगितले. (Sanjay Upadhyay)