मुंबई : ( Mega Block ) मध्य-हार्बर आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर रविवार दि. ३० नोव्हेंबर रोजी ४ तासांसाठी मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. रेल्वे ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि विघाविहार अप आणि डाऊन या मार्गांवर सकाळी १०: ५५ ते ३: ५५ पर्यंत मेगाब्लाँक असणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून रेल्वे २० मिनिटे उशिरा धावणार आहे.
हार्बर रेल्वेवरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे पनवेल, बेलापूर आणि ठाणे ते पनवेल दरम्यानच्या काही फेऱ्या रद्द होणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीनंतर १२: १५ ते रविवार पहाटे ४: १५ पर्यंत मुंबई सेंट्रल ते माहिम अप आणि डाऊन मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. यामुळे रात्री उशिरापर्यंतच्या फेऱ्या रद्द होणार असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत.