Dr. Ganesh Devi : मराठी भाषा अभिजात असून अभिजनांची आणि बहुजनांची आहे : पद्मश्री गणेश देवी

29 Nov 2025 20:13:53
(Dr. Ganesh Devi)
 
मुंबई : (Dr. Ganesh Devi) "जगातील ५ खंडामध्ये जवळजवळ ७ हजार भाषा बोलल्या जातात या बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेमध्ये मराठीचा १८ वा नंबर आहे तसेच १५०० वर्ष जुन्या भाषांमध्ये मराठीचा ७ वा नंबर आहे. मराठी अभिजनांची भाषा झाली कारण ती बहुजनांची आहे त्यामुळे मराठी भाषा ही अभिजात असून अभिजनांची आणि बहुजनांची आहे असे पद्मश्री डॉ. गणेश देवी (Dr. Ganesh Devi) यांनी सांगितले.
 
विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने लालबाग येथे आयोजित केलेल्या ६८ व्या विवेकानंद व्याख्यानमालेत भाषा अभिजात आणि बहुजन या विषयावर तिसरे पुष्प गुंफले त्यावेळी ते बोलत होते. पुढील ३० वर्षांमध्ये ७ हजार भाषा मरतील असे भाकीत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मराठी ही ज्ञानाची आणि कानाची भाषा करायची आहे. संस्कृत आणि प्राकृत या दोन्ही भाषेची सरमिसळ होत राहिली यामध्ये प्राकृत भाषा लुप्त झाली, मात्र संस्कृत ही भाषा अजूनही टिकून आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांची स्मरणशक्ती अल्पकालीन झाली आहे असेही गणेश देवी (Dr. Ganesh Devi) यांनी पुढे सांगितले.
 
हेही वाचा : Ashish Shelar : धमकी सत्र राबवणाऱ्यांचा पोलिस बिमोड करतील - मंत्री आशिष शेलार  
 
या प्रसंगी एम.के. बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे महेंद्र साळुंखे श्रोत्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आयुष्यात पुढे जायचं असेल तर शिक्षण गरजेचं आहे तसेच माझ्यासाठी केवळ दोन जाती महत्वाच्या आहेत एक म्हणजे गरीब आणि दुसरी श्रीमंत. आर्थिक दृष्ट्या श्रीमंत व्हा मात्र शारीरिक श्रीमंती ही महत्वाची आहे असा सल्ला यांनी यावेळी दिला.(Dr. Ganesh Devi)
 
यावेळी प्रास्ताविक उपमंडळ प्रमुख नरेश विचारे तर मान्यवरांचा परिचय आणि आभार सहाय्यक शारदास्मृती प्रमुख साहिल पाटील यांनी केले. बोधपटाचे वाचन आर्यन वारे तर सुस्वागतम प्रथम होडे यांनी केले. गीत गणेश पवार यांनी म्हंटले.(Dr. Ganesh Devi)
 
 
Powered By Sangraha 9.0