मुंबई : (Shirish Kanekar) नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) च्या Page to Stage या लोकप्रिय साहित्यिक मालिकेअंतर्गत ‘वेचक कणेकर’ (Shirish Kanekar) हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पेज टू स्टेज या मालिकेअंतर्गत पार पडणारा हा १०१ वा प्रयोग होता. या कार्यक्रमामध्ये शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांच्या विनोदी लेखनाचे अभिवाचन पार पडले. एनसीपीएचे संचालक खुष्रू सुनटूक यांच्या प्रयत्नातून व पेज टू स्टेज या उपक्रमाच्या डॉ. सुजाता जाधव यांच्या माध्यमातून व प्रख्यात निवेदक प्रसाद फणसे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रख्यात कलाकार डॉ. गिरीश ओक, संजय मोने, अजित भुरे, उदय सबनीस व प्रसाद फणसे यांनी यानिमित्ताने कणेकरांची साहित्यसृष्टी जीवंत केली. या कार्यक्रमाला मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी देखील उपस्थित होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे कौतुक करताना ते म्हणाले की " “अशा साहित्यिक उपक्रमांमुळे लेखक-कवींना उत्तम व्यासपीठ मिळते. ‘वेचक कणेकर’ अभिवाचन आणि आठवणींच्या जोडीत अतिशय विचारपूर्वक सादर झाला. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग NCPA सोबत कोणत्याही प्रकारच्या सहकार्यासाठी सदैव तयार आहे.” एनसीपीएच्या पेज टू स्टेज या उपक्रमांतर्गत साहित्यिक, कवी, नाटककार आणि प्रेक्षक यांच्यातील सांस्कृतिक दुवा अधिक मजबूत केला आहे. पुढील काळात भाषा विभागासोबत अनेक अर्थपूर्ण उपक्रम राबवण्याची योजना देखील आयोजकांनी राबवली आहे.(Shirish Kanekar)