Humayun Kabir : बाबरी मशीद बांधण्यापासून रोखले तर शिरच्छेद करू

29 Nov 2025 17:05:36
 
Humayun Kabir
 
मुंबई : (Humayun Kabir) काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर (Humayun Kabir) यांनी मुर्शिदाबादच्या बेलडांगा शहरात बाबरी नावाच्या मशिदीची पायाभरणी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांचा अजून एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी शहरातील बाबरी मशिदीचे बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न केल्यास शिरच्छेद करण्याची धमकी दिली आहे.(Humayun Kabir)
 
व्हिडिओमध्ये हूमायून म्हणत आहेत की, सध्या आपण ३७% आहोत, बाबरी मशीद बांधली जाईल तोपर्यंत आपण ४०% असू. पाहूया कोणती शक्ती आपल्याला रोखण्याचे धाडस करते. म्हणजेच कबीर (Humayun Kabir)यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील मुस्लिम लोकसंख्या वेगाने वाढत आहे आणि मशीद पूर्ण होईपर्यंत ती ४०% पर्यंत पोहोचेल.
ते पुढे म्हणतात, जर या कारवाईदरम्यान आमचे १०० लोक मारले गेले तर आम्ही दुसऱ्या बाजूचे ५०० लोक मारले जातील याची खात्री करू. हे आमचे आव्हान आहे. त्यांनी असा इशाराही दिला की, ही अयोध्या नाही तर मुर्शिदाबाद आहे. जर कोणी या मशिदीला हात लावण्याचे धाडस केले तर आम्ही काय करू शकतो ते दाखवून देवू. (Humayun Kabir)
 
हेही वाचा : Hindu organization : समाज माध्यमांवर हिंदू देवतांबद्दल अपमानास्पद टिप्पणी  
 
भाजपकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप
 
भाजपने हा व्हिडिओ प्रसिद्ध करून तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजपकडून तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर (Humayun Kabir) यांचे विधान धार्मिक चिथावणी आणि मतपेढीच्या राजकारणाचे उदाहरण असल्याचे सांगितले. भाजप नेत्यांनी आरोप केला की तृणमूल काँग्रेसचे आमदार समाजात फूट पाडणारी भाषा वापरत आहेत. मुर्शिदाबाद जिल्ह्यात सुमारे ७०% मुस्लिम लोकसंख्या आहे. अशा प्रकारे हुमायून कबीर यांनी या लोकसंख्येला बाबरी मशिदीच्या बांधकामाशी जोडून आपली शक्ती दाखविण्याचे आवाहन केले आहे.(Humayun Kabir)
 
 
Powered By Sangraha 9.0