Satara Literary Conference : साताऱ्याच्या साहित्य संमेलनात पहिल्यांदाच होणार ५ ब्रेल लिपीतील पुस्तकांचे प्रकाशन

    29-Nov-2025   
Total Views |
(Satara Literary Conference)
 
मुंबई : (Satara Literary Conference) साताऱ्यामध्ये पार पडणारे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपले आहे. हे साहित्य संमेलन (Satara Literary Conference) पूर्वीच्या संमेलनांपेक्षा वेगळे असावे यासाठी आयोजकांची लगबग सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर या संमेलनात आता एक अभिनव उपक्रम पार पडणार आहे. साताऱ्यातील चार दिवसांच्या साहित्य संमेलनामध्ये नेत्रहीन वाचकांसाठी ब्रेल लिपीतील ५ पुस्तकं प्रकाशित होणार आहेत. विषय विविधतेने नटलेली ही पुस्तकं, नेत्रहीन विद्यार्थ्यांच्या शाळांना भेट दिली जाणार आहे.(Satara Literary Conference)
 
ब्रेल लिपीमध्ये पुस्तक प्रकाशित करणे ही प्रकाशकांच्या दृष्टीने खर्चिक बाब असते, मात्र ज्ञानार्जनासाठी या पुस्तकांचे अनन्य साधारण महत्व असते. याच पार्श्वभूमीवर साताऱ्याच्या साहित्य संमेलनात या पुस्तकांचे प्रकाशन पार पडणार आहे. या उपक्रमासाठी सामाजिक दायित्त्व म्हणून इंडियाना सुक्रो टेक पुणे प्रा. लि. चे संचालक प्रमोदकुमार बेलसरे यांनी विशेष सहकार्य केले असून, ब्रेलच्या छपाईसाठी स्वागत थोरात यांचे सहकार्य लाभले आहे.(Satara Literary Conference)
 
हेही वाचा : Local Body Elections : नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी १ डिसेंबरला रात्री १० पर्यंत प्रचार करता येणार
 
नेत्रहीन वाचकांसाठी पर्वणी
 
" आपल्याकडे जे ज्ञानाचं प्रचंड भांडार आहे, ते ब्रेल लिपीच्या माध्यमातून नेत्रहीन वाचकांपर्यंत सुद्धा पोहोचले पाहिजे अशी अनेकांची भावना असते, मात्र प्रकाशकांसाठी आर्थीकदृष्टया ती गोष्ट शक्य असेलच असे नाही. म्हणूनच या वेळी साताऱ्या साहित्य संमेलनात आपण नेत्रहीन वाचकांसाठी ५ पुस्तकं प्रकाशित करणार आहोत. मात्र, यावरच न थांबता पुढच्या वर्षी ५० हून अधिक पुस्तकं प्रकाशित करणार आहोत. ऑडिओ बुक्स, ई बुक्स अशा वेगवेगळ्या माध्यमातून पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचत आहेत, त्यामुळे निश्चितच ही पुस्तकं म्हणजे नेत्रहीन वाचकांसाठी पर्वणीच असेल."(Satara Literary Conference)
 
- श्री. घनश्याम पाटील, प्रकाशक, चपराक प्रकाशन
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.