मुंबई : (Navi Mumbai International Airport) एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीने नुकतीच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन (Navi Mumbai International Airport) उड्डाणांसंदर्भातील मोठी घोषणा केली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Navi Mumbai International Airport) दि. २५ डिसेंबर रोजी उड्डाणे सुरू केली जाणार आहेत. इंडिगो, आकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांसारख्या विमान कंपन्यांनी आपापल्या उड्डाणांची घोषणा आधीच केली आहे. यानंतर आता बेंगळुरू आणि दिल्लीसाठी उड्डाणे सुरु करणार असल्याची अधिकृत घोषणा एअर इंडिया एक्सप्रेसने केली असून या उड्डाणाचे वेळापत्रक देखील समोर आले आहे. तसेच या उड्डाणासाठी अधिकृतपणे नोंदणी सुरु केली आहे.(Navi Mumbai International Airport)
एअर इंडिया एक्सप्रेस सुरुवातीला नवी मुंबई ते बेंगळुरू दररोज उड्डाणे करणार आहे. दिल्लीला जाणारी उड्डाणे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी असणार आहे. यामुळे देशातील दोन प्रमुख केंद्रांना कनेक्टिव्हिटी मिळेल, ज्याची सुरुवात नवी मुंबई विमानतळापासून (Navi Mumbai International Airport) होणार आहे. नवीन वर्षापासून म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून प्रवासाची सोय वाढवली जाणार आहे. या दोन्ही मार्गांवर दिवसातून दोनदा विमानसेवा सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांना सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही ठिकाणी पर्याय उपलब्ध होणार आहे. बेंगळुरू-दिल्ली मार्गावरील गर्दी कमी होणार आहे आणि शिवाय प्रवाशांना अधिक विमानाचा पर्याय मिळणार आहे. यामध्ये मुंबईहून आठवड्याला १३०हून अधिक आणि पुण्याहून ९० हून अधिक उड्डाणे समाविष्ट असणार आहेत.(Navi Mumbai International Airport)
हेही वाचा : मुंबईकरांसाठी मोठी बातमी: रविवारी मध्य-हार्बर आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर ४ तासांचा मेगाब्लॉक
इंडिगोने देखील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Navi Mumbai International Airport) थेट नवीन मार्ग आणि उड्डाणांची वाढलेली वारंवारता जाहीर केली आहे. इंडिगोने १० ठिकाणांसाठी उड्डाणे घोषित केल्यानंतर, आता नवीन विमानतळावर अधिक विस्ताराची तयारी केली असून उद्घाटनाच्या दिवशी पहिले उड्डाण उड्डाण आणि लँडिंगसाठी आवश्यक स्लॉट्सही मिळवले आहेत. इंडिगोने जाहीर केले की,दि. २९ डिसेंबरपासून NMIA–कोयंबतूर आणि NMIA–चेन्नई दरम्यान दररोज उड्डाणे सुरू होतील, तर 30 डिसेंबरपासून NMIA–वडोदरा मार्गावर आठवड्यातून ५ वेळा उड्डाणे सुरू होतील. तसेच दि.२६ डिसेंबरपासून NMIA–उत्तर गोवा मार्गावर आठवड्यातून ५ अतिरिक्त उड्डाणे सुरू केली जातील.(Navi Mumbai International Airport)