Dharavi : धारावी परिसरात सुरक्षिततेसाठी सक्षम उपायोजना, धारावीत विस्तारणार रस्त्यांचे जाळे आणि हरित पट्टे

29 Nov 2025 16:19:57
Dharavi
 
मुंबई : (Dharavi) मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाची अंमलबजावणी करत असताना, माहीम रेल्वे स्थानकाजवळील धारावी (Dharavi) परिसरात घडलेल्या अलीकडच्या आगीच्या दुर्घटनेने या उद्दिष्टाची अनिवार्यता प्रकर्षाने समोर आणली आहे. ही केवळ विकासात्मक योजना नसून, नागरिकांच्या मूलभूत सुरक्षिततेशी संबंधित असलेली अत्यावश्यक गरज असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले.(Dharavi)
 
मागील शनिवार, दि. २२ रोजी हार्बर मार्गावरील माहीम स्थानकालगत लागलेल्या भीषण आगीत अनेक झोपड्या आणि व्यावसायिक गाळे जळून खाक झाले. रेल्वे मार्गाच्या अगदी काही मीटर अंतरावर उभारलेल्या दाट आणि असुरक्षित झोपडपट्टीचे धोके या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले. किरकोळ आगीच्या घटना देखील शहराच्या वाहतूक यंत्रणेवर परिणाम करतात आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करतात. माहीम फाटक रोड परिसरातील रहिवासी श्याम राज मिश्रा यांनी सांगितले, “नवरंग कंपाऊंडमधील दोन मजली गाळ्यातील स्वयंपाकघरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळाली. पत्र्याच्या शेडचे अतिदाट वस्तीमध्ये व्यावसायिक गाळ्यातील ज्वलनशील सामग्री मुळे आग काही क्षणांत सर्वत्र पसरली.”(Dharavi)
 
धूर पसरताच रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे ओव्हरहेड वीजपुरवठा तात्काळ बंद केला. यामुळे गाड्यांची वाहतूक थांबली, प्रवाशांना रुळावरून पायी मार्गक्रमण करावे लागले. “जळालेल्या झोपड्यांचा सांगाडा रेल्वे रुळांवर पडला नाही हा दिलासा आहे. पण अशा घटनांमुळे धारावी पुनर्विकासाची गरज किती अत्यावश्यक आहे हे स्पष्ट होते,” असे रहिवासी राजू दळवी यांनी सांगितले.(Dharavi)
 
हेही वाचा : Dharavi Redevelopment Project : इमारतींच्या दुरावस्थेने धारावीकर हाऊसिंग सोसायट्या त्रस्त  
 
धारावी (Dharavi) पुनर्विकास प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या मते, धारावीतील अतिशय अरुंद व गर्दीचे अंतर्गत रस्ते ही सर्वांत मोठी अडचण असून आपत्कालीन बचाव कार्य वेळेत पोहोचण्यास यामुळे मोठे अडथळे निर्माण होतात. एनएमडीपीएलच्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले, “आराखड्यानुसार सद्यस्थितीत असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण होणार असून नव्या रस्त्यांचे जाळे उभारले जाईल. धारावीतील प्रत्येक विभागापर्यंत सुरक्षित आणि सुलभ प्रवेश सुनिश्चित केला जाईल. अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळाविना प्रवेश मिळावा यासाठी अग्निसुरक्षा नियमावली आणि प्रचलित डीसीपीआरनुसार सर्व तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील विविध ठिकाणी मोठ्या खुल्या जागांच्या स्वरूपात सुरक्षित एकत्रीकरण केंद्रे (अ‍ॅसेम्ब्ली पॉइंट्स) निर्माण केली जाणार आहेत. पुनर्विकास योजनेत पश्चिम/हार्बर रेल्वे मार्गालगत २० मीटर रुंदीचा समांतर रस्ता निर्माण करण्याचाही प्रस्ताव आहे. हा रस्ता नव्या धारावीच्या (Dharavi) पश्चिम सीमेचा संरक्षक पट्टा ठरेल आणि रेल्वे मार्गापासून सुरक्षित अंतर राखेल".(Dharavi)
 
“अकस्मात घटनांच्या वेळी रहिवाशांना विनाअडथळा मार्ग मिळावा तसेच रेल्वे परिसरावर कोणताही प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी हा रस्ता अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मध्य रेल्वे मार्गालगत सेक्टर-२ मध्ये हरित पट्ट्याची (ग्रीन बफर)ही योजना असून, त्यातून सुरक्षितता आणि पर्यावरणीय संरक्षण या दोन्ही उद्दिष्टांची पूर्तता होईल,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.(Dharavi)
 
Powered By Sangraha 9.0