मुंबई : (Dharavi Redevelopment Project) एकीकडे धारावी पुनर्विकास प्रकल्पाला (Dharavi Redevelopment Project) धारावीकरांचे समर्थन असल्याचे दिसत असताना काँग्रेस आणि उबाठा सेना प्रकल्पावरून सातत्याने नागरिकांची दिशाभूल करत आहे. तसेच, स्थानिकांना हा प्रकल्प नको असे वातावरण निर्माण करत आहेत. मात्र, स्थानिकांनी आधीच सर्वेक्षणात उस्फुर्त सहभाग घेत आपण या पुनर्विकास प्रकल्पाच्या (Dharavi Redevelopment Project) आणि राज्य सरकाराच्या सोबत असल्याचे दाखवून दिले आहे. अशातच आता या प्रकल्पाबाहेर असणाऱ्या १९ वर्षे जुन्या इमारतींनाही धारावी पुनर्विकासात समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी या गृहनिर्माण सोसायटींकडून होताना दिसते आहे. कामराज सोसायटीचे सचिव नित्यानंद नादार यांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी संवाद साधताना सांगितले,"आमच्या इमारती आता अत्यंत जुन्या झाल्या आहेत. आम्हाला भविष्यात पुनर्विकासात जावेच लागणार आहे. हे पाहता आमच्या काही किरकोळ मागण्या पूर्ण झाल्यास आम्ही देखील या पुनर्विकासात सहभागी होण्यास इच्छुक आहोत."(Dharavi Redevelopment Project)
दरम्यान, धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत (Dharavi Redevelopment Project) बांधण्यात येणाऱ्या सर्व पुनर्वसन इमारती या सर्व सुविधांनी सज्ज असणार आहे. या प्रकल्पांतर्गत पात्र रहिवाशांना धारावीतच ३५० चौरस फुटांचे घर मिळेल. धारावी पुनर्वसन प्रकल्पात उभारण्यात आलेल्या प्रत्येक पुनर्वसन इमारतीची देखभाल पुढील १० वर्षे एसपीव्ही-एनएमडीपीएलकडूनच केली जाणार आहे. तर निविदेच्या अटींनुसार पुढील काळातील म्हणजेच १० वर्षानंतर या देखभाल खर्चासाठी प्रत्येक पुनर्वसन इमारतीत १० टक्के व्यापारी जागा राखून ठेवण्यात आली आहे. या व्यावसायिक जागांमधून येणारा निधी हा इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी वापरता येईल. हेच पाहता एसआरएच्या नियमावलीनुसार १९ वर्षांपूर्वी धारावीत उभारण्यात आलेल्या इमारतीत २२५ चौरस फुटांत राहणाऱ्या धारावीकरांनाही आता पुनर्विकासात सभागी होण्याची इच्छा आहे. कारण या इमारतींना देखभाल आणि व्यवस्थापन शुल्कासाठीही मोठा संघर्ष करावा लागत आहे.(Dharavi Redevelopment Project)
हेही वाचा : Al-Falah : 'अल-फलाह'च्या कुलगुरुंचा नवा कारनामा! बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावल्या मृत हिंदूंच्या जमिनी
"२००६ साली बांधण्यात आल्या आहेत. या इमारतींना जवळपास २० वर्षे होत आले आहेत. याइमारतीतील सर्व रहिवासी झोपड्यात राहणारे, त्यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत आम्हाला या ठिकाणी २२५ चौ.फुटांची घरे मिळाली. आता या इमारतींची स्थिती अत्यंत खराब आहे. दररोज आम्हाला इमारतीच्या डागडुगीवर हजारो रुपये खर्च करावे लागतात. लिफ्ट, ड्रेनेज, स्वच्छ पिण्याचे पाणी, इमारतीत येण्यासाठी मोकळे रस्ते नाहीत. आताच इमारतीची अवस्था अशी आहे आगामी काळात आणखी खराब होईल. आम्ही जरी पुनर्विकास करायचा ठरवलं तरी त्यासमोर असंख्य अडचणी उभ्या राहतील. म्हणूनच धारावी पुनर्वसन प्रकल्पातच आमच्या इमारतींचा समावेश करावा आणि धारावीतच आम्हाला ५००चौ.फुटांपर्यंत घरे मिळाली तर आम्ही आनंदाने या पुनर्विकासात सहभागी होऊ."(Dharavi Redevelopment Project)
- नित्यानंद नाडर, सचिव, कामराज हाऊसिंग सोसायटी, धारावी.
"धारावी पुनर्विकास होणे ही काळाची गरज आहे. खरंतर केव्हाच धारावीचा पुनर्विकास (Dharavi Redevelopment Project) होणे आवश्यक होते. ही इमारत आम्ही सर्व गरिबांनी आणि सर्वसामान्यांनी मिळून बांधली. तेव्हाही इथे कोणत्याही राजकीय पक्ष किंवा सरकारी यंत्रणा आणि नेत्यांनी कधीही मदत केली नाही. का नाही आले तेव्हा कोणी? तुमच्याकडे सत्ता होती. तरीही तुम्ही धारावीचा विकास केला नाही. आत्ताचे सरकार ते करत आहेत हे स्वागतार्ह आहे. मात्र, इतकेच म्हणणं आहे की इथल्या गरीब आणि सर्वसामान्यांसाठी हा पुनर्विकास व्हावा. आम्हीही या पुनर्विकासात सहभागी होऊ मात्र आमच्या काही मागण्या आहेत. त्याबाबत सकारात्मक निर्णय आला तरच आम्ही यामध्ये सहभागी होऊ."(Dharavi Redevelopment Project)
- रवी सुब्रह्मण्यम, धारावी