मुंबई : (Cyclone Ditwah) श्रीलंकेत वादळ दिटवामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. या पूरात आतापर्यंत १२३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १३० जण अजूनही बेपत्ता आहेत. आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसात अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली. त्यानंतर ४३,९९५ लोकांना सरकारी कल्याणकारी केंद्रांमध्ये हलवण्यात आले. श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या आपत्तीत अडकलेल्या श्रीलंकन नागरिकांना वाचवण्यासाठी सशस्त्र दलांच्या मदत मदतकार्य सुरू आहेत. (Cyclone Ditwah)
हेही वाचा : रोहित राऊत पहिलावहिला ‘आय-पॉपस्टार’
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, भारताने शनिवारी दि, २९ नोव्हेंबर रोजी सकाळीच विमानाने पीडितांसाठी काही आत्यावश्यक साहित्य पाठवले आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यासोबतच भारत अधिक मदत पाठवण्यास तयार आहे. (Cyclone Ditwah)