मुंबई : ( WPL Auction 2026 ) नुकताच नवी दिल्ली पार पडलेल्या महिला प्रिमियम लीग २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये फ्रेंचायझींनी खेळाडूंवर अक्षरश: पैशांचा वर्षाव केला आहे. यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये दिप्ती शर्मा ही सर्वात महागडी खेळाडू बनली आहे. दिप्ती शर्मावर तब्बल ३ कोटी २० लाखांची बोली लावत यूपी वाँरियर्स दिप्तीला त्यांच्या टीममध्ये सामील केले आहे. सर्वात आधी दिल्ली कॅपिटल्सने दिप्तीवर ५० लाखांच्या बोली लावली होती, परंतु यूपी वाँरियर्सने राईट टू मँच कार्डचा वापर करत दिप्तीला पुन्हा एकदा आपल्या संघात सामील करून घेतले आहे.
अमेलिया केर
न्यूझीलंडची अष्टपैलू असलेली अमेलिया केरला मुंबई इंडियन्सने मेगा आँक्शनपूर्वी रिलीज केले होते. अमेलियाने स्वत:ची बेस प्राइज ५० लाख रुपये ठेवली होती. यूपी वाँरियर्स आणि मुंबई इंडियन्सच्या चढाओढीनंतर अखेर मुंबई इंडियन्सने बाजी मारून ३ कोटी रूपयांची बोली लावत अमेलिया केरला संघात सामील करून घेतले आहे.
शिखा पांडे
भारताची वेगवान गोलंदाज असलेली शिखा पांडे हिला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी आरसीबी आणि यूपी वाँरियर्समध्ये चढाओढ दिसून आली. शेवटी यूपी वाँरियर्स २.४ कोटीची बोली लावत तिला आपल्या संघात घेण्यास यशस्वी ठरली.
सोफी डिव्हाईन
न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू असलेल्या सोफी डिव्हाईन आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी दिल्ली कँपीटल्स आणि आरसीबीमध्ये मोठी चढाओढ झाली. अखेर गुजरात जायंट्सने बाजी मारत २ कोटी रूपयांची बोली लावत तिला आपल्या संघात सामील करून घेतले.
मेग लॅनिंग
ऑस्ट्रेलिया खेळाडू मेग लॅनिंग ही मागच्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार होती, तिच्या नेतृत्वाखाली संघ अंतिम फेरीत देखील पोहोचला होता. मेगा आँक्शनमध्ये फ्रेंचायझींनी तिला रिलीज केले होते. यामुळे यूपी वाँरियर्सनी १.९० कोटींच्या बोलीसह तिला आपल्या संघात सामील केले.