मुंबई : (President Vladimir Putin) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे २३व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी ४ डिसेंबरपासून दोन दिवसांसाठी भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर रोजी दिली आहे. पुतिन (President Vladimir Putin) त्यांच्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींची भेट घेणार असून, त्यांच्यात द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा होणार आहे.
हेही वाचा : donald trump : व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबारानंतर ट्रम्प आक्रमक! म्हणाले, "अमेरिका सर्व 'तिसऱ्या जगातील देशां'मधून होणारे स्थलांतर..."
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President Vladimir Putin) आणि पंतप्रधान मोदी हे आगामी राजकीय भेट भारत आणि रशियाच्या नेतृत्वाला द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेण्याची, 'विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी' मजबूत करण्यासाठी दृष्टिकोन निश्चित करण्याची आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी प्रदान करेल," असे परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. (President Vladimir Putin)
हे वाचलात का ? : Ditwah Cyclone : 'दितवाह' वादळ कुठे धडकणार? IMD कडून 'या' राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
वार्षिक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेव्यतिरिक्त, राष्ट्राध्यक्ष पुतिन (President Vladimir Putin) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतील. २१ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी ६ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रपती पुतिन (President Vladimir Putin) भारतात आले होते. त्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.