Dr. Mirza Rafi Ahmed Baig : वऱ्हाडी भाषेची मिर्झा एक्सप्रेस काळाच्या पडद्याआड

28 Nov 2025 19:12:09
 (Dr. Mirza Rafi Ahmed Baig)
 
मुंबई : (Dr. Mirza Rafi Ahmed Baig) हास्यसम्राटच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले सुप्रसिद्ध कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग (Dr. Mirza Rafi Ahmed Baig) यांचे २८ नोव्हेंबर रोजी निधन झाले. वयाच्या ६८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागचे काही दिवस ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. मात्र काल उपचारादरम्यान अमरावतीमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ते राहत होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी फातिमा मिर्झा, मुलगा रमीज, मुलगी महाजबी व हुमा असा परिवार आहे. अमरावती येथील ईदगा कब्रस्तान येथे त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Dr. Mirza Rafi Ahmed Baig)
 
वयाच्या अकराव्या वर्षापासून काव्य लेखनाची कास धरलेल्या मिर्झा यांनी १९७० पासून कविता सादर करायाला सुरुवात केली. सामाजिक जाण असलेला विनोदी लोककवी अशी त्यांची सर्वत्र ख्याती होती. त्यांच्या हयातीमध्ये त्यांचे २० हून अधिक काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते, तसेच ६ हजरांहून अधिक काव्यमैफीलीचे प्रयोग केले. विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवले होते. त्यांनी आपल्या वाणीतून वऱ्हडी भाषा राष्ट्रीय स्तरावर पोहोचवली. ग्रामीण भागातील समस्या असो किंवा राजकीय विरोधाभास, या साऱ्या विषयांवर ते मार्मिक शैलीमध्ये भाष्य करत असत. विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी केलेले स्तंभलेखन सुद्धा लोकप्रिय झाले. (Dr. Mirza Rafi Ahmed Baig)
 
हेही वाचा : PM Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते गोव्यात भगवान रामाच्या आशियातील 'सर्वात उंच' पुतळ्याचे अनावरण  
 
सामाजिक जाण असलेला कवी हरपला
 
सुप्रसिद्ध कवि, हास्यसम्राट आणि मिर्झा एक्स्प्रेस म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे, असे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग (Dr. Mirza Rafi Ahmed Baig) यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने एक उत्तम विनोदी लोककवी आणि सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. वृत्तपत्रातील त्यांचे लेखन अतिशय गाजले होते. कालौघात त्यांनी नवीन माध्यमाचाही तितक्याच सहजतेने स्वीकार केला. शेती आणि माती हा त्यांच्या काव्यलेखनाचा गाभा होता. त्यांचे सामाजिक भान वाखाणण्यासारखे होते. मराठी आणि त्यातही वऱ्हाडी भाषेवर त्यांनी निस्सीम प्रेम केले. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. (Dr. Mirza Rafi Ahmed Baig)
- मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
 
भावस्पर्शी व्यक्तिमत्व हरपले
 
मराठी - वऱ्हाडी बोलीचे अभ्यासक, कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग (Dr. Mirza Rafi Ahmed Baig) यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने साहित्यविश्वातील एक भावस्पर्शी व्यक्तिमत्व हरपले आहे. दमदार सामाजिक जाणिवेतून आणि लोकभाषेतील अभिव्यक्तीतून त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटावर आपला ठसा उमटवला. त्यांनी मराठी वऱ्हाडी साहित्यपरंपरेला नव्या क्षितिजावर नेले.डॉ. मिर्झा रफी अहमद बेग (Dr. Mirza Rafi Ahmed Baig) यांच्या आत्म्यास शांती लाभो!
- मा. श्री. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
 
Powered By Sangraha 9.0