Mission Sudarshan Chakra : भारताची हवाई कवचक्रांती! ‘सुदर्शन चक्रा'मुळे एअर डिफेन्स अधिक सक्षम

28 Nov 2025 14:36:23
 
Mission Sudarshan Chakra
 
मुंबई : (Mission Sudarshan Chakra) भारतातील हवाई संरक्षण व्यवस्था गेल्या काही वर्षांत लक्षणीयरित्या बळकट झाली असून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्वदेशी विकास यामुळे भारताची सुरक्षा अधिक सक्षम होत आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमचे महत्त्व आपल्या लक्षात आले, आणि आता त्याच पार्श्वभूमीवर भारत आपले आणखी एक एअर डिफेन्स मिशन 'सुदर्शन चक्र' (Mission Sudarshan Chakra)लॉन्च करत आहे. आजकाल सर्वत्र विविध प्रकारचे हल्ले होत असताना, या हल्ल्यांविरोधी भारताने काढलेले 'सुदर्शन चक्र' (Mission Sudarshan Chakra) हे संरक्षणाच्यादृष्टीने देशाला बळकटी देणारं असेल. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारताकडे S-400 सारखी एअर डिफेन्स सिस्टिम होती. त्यामुळे पाकिस्तानचे हवाई हल्ले यशस्वी होऊ शकले नाहीत.(Mission Sudarshan Chakra)
 
परंतु, त्या अनुभवाच्या आधारे भारताला हे प्रकर्षाने जाणवले की देशाकडे यापेक्षा अधिक सक्षम आणि मजबूत एअर डिफेन्स प्रणाली असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळेच भारत आता चीन आणि पाकिस्तान या दोन्ही सीमांकडून येणाऱ्या आव्हानांचा एकाच वेळी मुकाबला करण्याची तयारी करत आहे. भारतीय हवाई दलाने यासाठी संरक्षण मंत्रालयाला रशियाकडून S-400 ट्रायंफ एअर डिफेन्स सिस्टिमचे आणखी ५ स्क्वाड्रन खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला असून, सरकार त्यावर गंभीरपणे विचार करत आहे. यासोबतच भारत स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली ‘मिशन सुदर्शन चक्र’ विकसित करण्याच्या दिशेनेही वेगाने पावलं टाकत आहे. देशातच प्रगत एअर डिफेन्स सिस्टिम तयार करण्याची ही मोहीम आता प्रत्यक्ष आकार घेऊ लागली आहे.(Mission Sudarshan Chakra)
 
हेही वाचा : Donald Trump : व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबारानंतर ट्रम्प आक्रमक! म्हणाले, "अमेरिका सर्व 'तिसऱ्या जगातील देशां'मधून होणारे स्थलांतर..."  
 
मिशन 'सुदर्शन चक्र' नेमकं काय आहे?
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात देशासाठी एक सर्वसमावेशक एअर डिफेन्स कवच तयार करण्याच्या उद्देशाने ‘मिशन सुदर्शन चक्र’ (Mission Sudarshan Chakra) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली होती. या नव्या प्रणालीचं स्वरूप आणि कामकाज कसं असेल, याबाबतची प्राथमिक माहिती आता अधिक स्पष्ट होत आहे.
या प्रकल्पांतर्गत जमिनीसोबतच आकाश आणि समुद्र या तिन्ही स्तरांवर पसरलेलं एक पूर्णपणे सुरक्षित आणि बहुपर्यायी संरक्षण कवच उभारण्याची योजना आहे. ‘सुदर्शन चक्र’ (Mission Sudarshan Chakra) कार्यान्वित झाल्यानंतर त्याची क्षमता इतकी प्रगत असेल की आयरन डोम आणि THAAD सारख्या सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय एअर डिफेन्स प्रणालीही त्याच्या तुलनेत कमी प्रभावी वाटतील, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
 
सुदर्शन चक्र मिशनच्या पूर्णत्वासाठीचा एकूण खर्च किती ?
 
‘इंडिया डिफेन्स रिसर्च विंग’च्या अहवालानुसार, या प्रकल्पाचा एकूण खर्च साधारण १.३ लाख कोटी ते १.७ लाख कोटी रूपये या दरम्यान राहील, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.(Mission Sudarshan Chakra)
 
मिशन सुदर्शन चक्र (Mission Sudarshan Chakra)हा केवळ एअर डिफेन्स प्रोजेक्ट नसून भारताच्या दीर्घकालीन सुरक्षिततेचा एक निर्णायक टप्पा ठरणार आहे. उन्नत तंत्रज्ञान, वाढीव गुंतवणूक आणि स्वदेशी क्षमतांवर आधारित हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला, तर भारताला हवाई सुरक्षेत जागतिक पातळीवर महत्त्वाचं स्थान प्राप्त होऊ शकते.
 
 
Powered By Sangraha 9.0