Narendra Modi : बदलत्या काळातही गोव्याची संस्कृती मूळ स्वरूपाशी निष्ठावान राहिली : पंतप्रधान नरेंद्र मोदी

28 Nov 2025 19:54:48
Narendra Modi
 
मुंबई  : (Narendra Modi) असेही काळ आले जेव्हा गोव्याच्या मंदिरांवर आणि स्थानिक परंपरांवर संकट आले. भाषा आणि सांस्कृतिक ओळख दडपण्याचे प्रयत्न झाले. पण या परिस्थितींनी समाजाच्या आत्म्याला दुर्बल केले नाही; उलट त्याला अधिक मजबूत केले. गोव्याची हीच खासियत आहे की इथली संस्कृती कोणत्याही बदलात आपल्या मूळ स्वरूपाशी निष्ठावान राहिली आणि काळानुसार पुनरुज्जीवितही झाली”, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले.
 
गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाली जीवोत्तम मठात शुक्रवारी प्रभू श्रीरामांच्या 77 फूट उंच कांस्य प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. मठाच्या ५५०व्या वर्षगाठीनिमित्त आयोजित ‘सार्ध पंचशतामनोत्सव’ कार्यक्रमात हा सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधानांनी (Narendra Modi) रामायण थीम पार्क गार्डनचे उद्घाटन, तसेच विशेष स्मारक टपाल तिकीट आणि स्मृती नाणे जारी केले व उपस्थितांना संबोधितही केले.
 
याप्रसंगी व्यासपीठावर गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि राज्यातील कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. अनावरणापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मठ परिसरातील प्राचीन मंदिरात दर्शन घेऊन पूजा-अर्चना केली.
 
हेही वाचा : Local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांना स्थगिती नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय  
 
उपस्थितांना संबोधत पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणाले, “श्री संस्थान गोकर्ण पर्तगली जीवोत्तम मठ आपल्या स्थापनेची ५५० वी वर्षगाठ साजरी करत आहे. गेल्या ५५० वर्षांत या संस्थेने काळातील असंख्य आव्हानांचा सामना केला. युग बदलले, काळ बदलला, देश-समाजात अनेक परिवर्तनं झाली; पण बदलते युग आणि आव्हानांमध्येही या मठाने आपली दिशा कधीच हरवली नाही. उलट, हा मठ लोकांना दिशा देणारे एक केंद्र म्हणून उभा राहिला आहे.” (Narendra Modi)
 
भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणावर भर देताना पंतप्रधान (Narendra Modi) म्हणाले, “आज भारत एका अद्भुत सांस्कृतिक पुनर्जागरणाचा साक्षीदार आहे. अयोध्येत राम मंदिराचे पुनर्स्थापन, काशी विश्वनाथ धामाचे भव्य पुनरुद्धार, आणि उज्जैनमधील महाकाल कोरिडोरचा विस्तार… हे सर्व आपल्या राष्ट्राच्या त्या जागरूकतेचे दर्शन घडवतात, जी आपली अध्यात्मिक धरोहर नव्या शक्तीने उभारीत आहे. आजचा भारत आपली सांस्कृतिक ओळख नवीन संकल्पांनी आणि नव्या आत्मविश्वासाने पुढे नेत आहे.”
 
मठाच्या इतिहासाचा उल्लेख करताना पंतप्रधान  (Narendra Modi) पुढे म्हणाले, “आज इथे प्रभू श्रीरामांच्या भव्य मूर्तीच्या अनावरणाचा शुभ प्रसंग लाभला. रामायणावर आधारित थीम पार्कचे उद्घाटनही झाले. या मठाशी आज जे नवीन आयाम जोडले गेले आहेत, ते भावी पिढ्यांसाठी ध्यान, प्रेरणा आणि साधनेची स्थायी केंद्रे ठरणार आहेत. इथे विकसित होत असलेले संग्रहालय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त 3D थिएटर… यांच्या माध्यमातून हा मठ आपली परंपरा सुरक्षित ठेवत आहे आणि नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक मूळाशी जोडत आहे.”
 
हे वाचलंत का? : Dr. Mirza Rafi Ahmed Baig : वऱ्हाडी भाषेची मिर्झा एक्सप्रेस काळाच्या पडद्याआड  
 
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, मठाला ५५० वर्षे पूर्ण होत आहेत आणि या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी प्रभू श्रीरामांची प्रतिमेचे अनावरण केले. अयोध्येत जसे राममंदिर पूर्ण झाले आहे, तसेच हा देखील एक ऐतिहासिक क्षण आहे. श्रीरामाची एवढी मोठी प्रतिमा देशात कुठेही नाही. पर्यटनाच्या दृष्टीने हा गोव्यासाठी मोठा टप्पा आहे.” (Narendra Modi)
 
उत्सव समितीचे संयुक्त संयोजक एस. मुकुंद कामत यांनी सांगितले की, देशभरातून १५ हजारहून अधिक समारंभाला आले आहेत. संपूर्ण 11 दिवसांच्या उत्सवात 1.2 लाखांहून अधिक भक्तगण येथे येण्याची शक्यता आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शंकर महादेवन, अनूप जलोटा यांसारखे नामांकित कलाकारही सादरीकरण करणार आहेत. (Narendra Modi)
 
भगवान श्रीरामांची भव्य प्रतिमा 77 फूट उंच असून कांस्य धातूपासून तयार केली आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम व्ही. एस. सुतार यांनी ही मूर्ती घडविली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0