मुंबई : (Smart and Intelligent Village Project) राज्यातील ग्रामीण भागाचे रुपांतर स्वयंपूर्ण, तंत्रज्ञान सक्षम आणि विकसित समुदायामध्ये समुदायामध्ये करण्याच्या उद्देशाने राज्यात स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज प्रकल्प (Smart and Intelligent Village Project) राबवण्यात येत आहे. राज्यभरातील ५ जिल्ह्यांतील ७५ गावांमध्ये हा प्रकल्प राबणार असून सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.(Smart and Intelligent Village Project)
याअंतर्गत डिजिटल संपर्क, ई-शासन, शिक्षण, आरोग्य, शेती, स्वच्छता आणि नवीकरणीय ऊर्जा यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यावर भर देऊन त्यामध्ये ग्रामस्थांचा सहभाग घेऊन स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील १० गावे समाविष्ट करून स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज करण्याची घोषणा केली आहे.(Smart and Intelligent Village Project)
हेही वाचा : Anti-Sanatan Literature : अंबिवली स्टेशनजवळ सनातनविरोधी साहित्याचे वाटप
कोणत्या तालुक्यांमध्ये राबवणार प्रकल्प?
त्यानुसार, पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर नागपूर, अमरावती, हिंगोली, पुणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील एकूण ७५ गावांमध्ये स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज प्रकल्पाचा (Smart and Intelligent Village Project) विस्तार करण्यात येणार आहे.(Smart and Intelligent Village Project)
जिल्हा तालुका गावांची संख्या
नागपूर काटोल १०
अमरावती चांदुरबाजार २३
हिंगोली कळमनुरी ११
पुणे बारामती १०
सिंधुदुर्ग वैभववाडी २१
या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.(Smart and Intelligent Village Project)