कल्याण : (KDMC Sanitation Workers) नजरचुकीने कचऱ्यात गेलेला महागडा सोन्याचा हार महिलेला परत मिळवून दिल्याच्या घटनेला एक महिना उलटत तोच केडीएमसी सफाई कर्मचाऱ्यांनी (KDMC Sanitation Workers) दाखवलेल्या आणखी एका प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कल्याण पूर्वेतीलच एका महिलेचे कचऱ्यामध्ये चुकून गेलेले सोन्याचे कानातले परत मिळवून देण्याचा सकारात्मक प्रकार समोर आला आहे. (KDMC Sanitation Workers)
कल्याण पूर्वेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाजवळील पूना लिंक रोडवर जय शिव सह्याद्री हौ. सोसायटी नावाची चाळ आहे. या परिसरातून केडीएमसी - सुमित एल्कोप्लास्टच्या सफाई कर्मचाऱ्यांनी (KDMC Sanitation Workers) सकाळच्या वेळेत नेहमीप्रमाणे कचरा संकलन केले. त्यावेळी या चाळीमध्ये राहणाऱ्या अंकिता अनिल मोरे यांचे सुमारे 1 तोळ्याचे आणि लाख रुपये किमतीचे सोन्याचे जुने कानातले नजरचुकीने कचऱ्यात टाकले गेले. मात्र ही बाब त्यांच्या लक्षात येईपर्यंत साधारणपणे तासभर वेळ होऊन गेला होता. त्यानंतर अंकिता यांनी लगेचच सुमित कंपनीचे सुपर वायजर भूषण सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितल्यानंतर सूर्यवंशी यांनी लगेचच संबंधित गाडीचे लोकेशन शोधून काढले. ही गाडी त्याच परिसरातील नूतन ज्ञानमंदिर शाळेजवळच कचरा संकलनाचे काम करत होती. भूषण सूर्यवंशी यांनी तात्काळ अंकिता मोरे यांना त्याठिकाणी घेऊन गेले. आणि घंटागाडीसोबत उपस्थित असलेल्या विनोद बेलीलकर, चैतन्य वाजे, सुनील तेलम या कर्मचाऱ्यांनी गाडीतील सर्व कचरा तिकडेच रस्त्यावर उतरवला. त्यानंतर अंकिता मोरे यांच्या उपस्थितीत कचऱ्यातील प्रत्येक पिशवी आणि कागदाची पुडी त्यांनी तपासून पहिली. आणि अखेर तब्बल पाऊण एक तासाच्या अथक शोधमोहीमेनंतर मोरे यांचे कानातले असलेली कचऱ्याची पिशवी सापडली. आणि मग अंकिता यांच्या चेहऱ्यावरील दुखाश्रूंचे आनंदाश्रुंमध्ये रूपांतर झाले. यावेळी केडीएमसीचे स्वच्छता निरीक्षक अमित भालेराव आणि सुमित एल्कोप्लास्ट कंपनीचे युनिट ऑफिसर समीर खाडे हेदेखील उपस्थित होते. (KDMC Sanitation Workers)
हेही वाचा : Ghazalnawaz Bhimrao Panchale : मी मातीतला माणूस, लोककलेने माझे भरणपोषण केले : गझलनवाझ भीमराव पांचाळे
हे केवळ सोन्याचे कानातले नव्हे तर आई वडिलांची आठवण...अंकिता मोरे
आपण सातव्या इयत्तेमध्ये असताना आई बाबांनी खास माझ्यासाठी हे सोन्याचे कानातले केले होते. आज माझ्या लग्नाला सत्तावीस वर्षे झाली असून हे केवळ कानातले नाही तर माझ्या आई वडिलांची आठवणच आहे. आणि ते परत मिळवून दिल्याबद्दल केडीएमसी सफाई कर्मचारी आणि सुमित एल्कोप्लास्ट कंपनीचे मनापासून आभारी आहोत असे सांगतानाच आपसूकच अंकिता मोरे यांचे डोळे पाणावले होते. तर आज अंकिता मोरे यांचा वाढदिवस असल्याने हा दिवस त्यांच्यासाठी अतिशय खासच ठरला अशी प्रतिक्रिया त्यांच्या शेजाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. (KDMC Sanitation Workers)
विशेष म्हणजे गेल्या महिन्यातही कल्याण पूर्वेतील एका महिलेचा सोन्याचा हार नजरचुकीने कचऱ्यात गेला होता. तोदेखील केडीएसमी आणि सुमित एल्कोप्लास्ट कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेला परत मिळवून देत प्रामाणिकपणाचे उदाहरण दिले होते. त्यापाठोपाठ आजही त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली असून केडीएमसी सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे करावे तितके कौतुक कमीच ठरेल. (KDMC Sanitation Workers)