Salim Khan : मुस्लिम लांगूलचालन करण्याच्या नादात काँग्रेसने वाहिली सलीम खानला श्रद्धांजली, २६/११ च्या हुतात्म्यांचाही केला अवमान

27 Nov 2025 12:41:38



 
Salim Khan
 
मुंबई : (Salim Khan) सध्या महाराष्ट्र काँग्रेसची एक्सवरील एक पोस्ट भलतीच व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्र पोलिसांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यासोबतच त्यांच्या नावांची यादी देखील टाकली आहे, ज्यात सलीम खान (Salim Khan) या नावाचाही सामावेश आहे. मात्र खरं तर, सलीम खान (Salim Khan) नावाची अशी कोणतीही व्यक्ती अस्तित्वात नाही. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) जाणूनबुजून या यादीत एका मुस्लिमाचे नाव जोडले असावे यात काही शंका नाही.
 
हेही वाचा :  Dr. Vishal Kadne : ५ डिसेंबरच्या शाळा बंद आंदोलनाला शिक्षक विकास मंडळाचा जाहीर पाठिंबा - प्रा. डॉ. विशाल कडणे




दरम्यान, ही पोस्ट अनेक लोकांनी पाहिल्यानंतर, त्यांत जाणूनबुजून टाकण्यात आलेल्या सलीम खान (Salim Khan) या नावाला लोकांनी हायलाइट केले. त्यांनंतर थोड्याच वेळात ही पोस्ट एक्सवरून डिलीट करण्यात आली. मात्र आता लोकांकडून या सर्व प्रकाराची खिल्ली उडवली जात आहे. त्यासोबतच, हा सलीम खान (Salim Khan) राहुल खानचा नातेवाईक आहे का? असे प्रश्न विचारले जात आहे. (Maharashtra Congress)

 
पोस्टमध्ये नेमकं लिहिलय काय ?
 
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात निर्दोष नागरिकांना तसेच या हल्लात मुंबईकरांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारे शहीद हेमंत करकरे, तुकाराम ओंबळे, अशोक कामटे, सलीम खान (Salim Khan) व इतर बहादुर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली! (Maharashtra Congress)
 









Powered By Sangraha 9.0