मुंबई/पुणे : ( Publication of the special issue RSS and Dr. Babasaheb Ambedkar ) अमृतमहोत्सवी संविधान वर्षानिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे ‘रा. स्व. संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विशेषांकाचे प्रकाशन मुंबई अध्यक्ष भाजप आ. अमीत साटम यांच्या हस्ते बुधवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी अंधेरी येथे करण्यात आले. यावेळी मुंबई भाजपचे सरचिटणीस राजेश शिरवडकर, अनुसूचित मोर्चा भाजप मुंबई अध्यक्ष शरद कांबळे, दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या सामाजिक न्याय वरिष्ठ प्रतिनिधी योगिता साळवी, सामाजिक न्याय प्रतिनिधी सागर देवरे, सिनियर स्पेस सेल्स एझियुटिव प्रशांत कांबळे यांच्यासह अनेक संविधानप्रेमी नागरिक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हितचिंतक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
तर उजवीकडील तीन छायाचित्रांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खा. मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री आ. माधुरी मिसाळ, अभिनेते रमेश परदेशी पुण्यामध्ये अमृतमहोत्सवी संविधान वर्षानिमित्त दै. मुंबई तरुण भारतच्या वतीने काढलेल्या ‘रा. स्व. संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विशेषांकाचे प्रकाशन करताना दिसत आहेत.