कल्याण : (Abhinav Goyal) संविधान हे जिवंत दस्तऐवज असून बदलत्या परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आहे. मुलांपर्यंत संविधानाचे ज्ञान पोहोचल्यास राष्ट्र अधिक सक्षम व सजग नागरिक घडवेल, असे मत केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी केले.(Abhinav Goyal)
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संविधान मूल्यांची जनजागृती शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या पूर्ण वर्षभरात ‘हर घर संविधान’, सामूहिक प्रास्ताविक वाचन, निबंध, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा, व्याख्यानमाला आणि चर्चासत्रे अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . मुख्य कार्यक्रमात महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल (भा.प्र.से.) यांनी उपरोक्त मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.(Abhinav Goyal)
गोयल म्हणाले, संविधान हे जिवंत दस्तऐवज असून बदलत्या परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आहे. नागरिकांनी मूलभूत अधिकारांबरोबरच मूलभूत कर्तव्यांचे पालन करून समानता, न्याय आणि लोकशाही मूल्यांचे दैनंदिन जीवनात पालन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आंबेडकर उद्यान परिसरात ग्रंथालय, ऑडिटोरियम आणि स्मृतीस्थळ यांचा समावेश असलेली एकात्मिक सुविधा उभारून आंबेडकरी विचारांची परंपरा पुढील पिढीपर्यंत दृढ करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.(Abhinav Goyal)
हेही वाचा : Hanuman Chalisa : ऐतिहासिक! 'हनुमान चालीसा' व्हिडिओने ओलांडला ५ अब्ज व्ह्यूजचा टप्पा
या कार्यक्रमात संविधान अभ्यासक व विश्लेषक प्राध्यापक नूरखा पठाण यांनी भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, लोकशाही व्यवस्था, सामाजिक समरसता आणि बदलत्या सामाजिक संदर्भातील संविधानाचे महत्त्व या विषयांवर प्रभावी विचार मांडले. विचारमंचावर कार्यक्रम अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त मा. योगेश गोडसे, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त संजय जाधव, प्रसाद बोरकर, रामदास कोकरे, महापालिका सचिव किशोर शेळके, माजी महापौर रमेश जाधव, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा रोकडे, रतन बनसोडे, संयोजक चंद्रकांत पोळ, विजय सरकटे आणि संतोष हेरोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्था अध्यक्ष चंद्रकांत पोळ यांनी केले.(Abhinav Goyal)
आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण (प.) येथे सांस्कृतिक कार्यक्रम व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन केडीएमसी मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण “ वुई व पिपल- संगीतमय महानाट्य” हे होते. भारतीय संविधानाची गौरवगाथा, आंबेडकरी विचारसरणी, सामाजिक न्याय, लोकशाही तत्त्वज्ञान आणि बहुजन इतिहासाची उत्कृष्ट मांडणी करणारी ही संगीत नाट्यकृती शाहीर सीमा पाटील आणि संगीतकार जॉली मोरे यांनी अत्यंत प्रभावी आणि भावपूर्ण पद्धतीने सादर केली. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सदर कार्यक्रमाच्या प्रबोधन सत्राचे सूत्रसंचालन समाधान मोरे यांनी केले.(Abhinav Goyal)
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कल्याण डोंबिवली महानगरपालिका, क. डों. म. प. बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सर्व उपक्रमांतून भारतीय संविधानाचा आत्मा, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक समरसतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.(Abhinav Goyal)