Hanuman Chalisa : ऐतिहासिक! 'हनुमान चालीसा' व्हिडिओने ओलांडला ५ अब्ज व्ह्यूजचा टप्पा

27 Nov 2025 17:16:35
Hanuman Chalisa
 
मुंबई : (Hanuman Chalisa) साधारण १४ वर्षांपूर्वी समाजमाध्यम युट्यूबवर अपलोड केलेला हनुमान चालिसाचा व्हिडिओ ५ अब्जाहून अधिक लोकांनी पाहिल्याचे निदर्शनास आले आहे. व्हिडिओ अपलोड करणाऱ्या व्यक्तीने याबाबत माहिती दिली. ५ अब्जांच्या पुढे व्ह्यूज जाणारा हा पहिला आणि एकमेव भारतीय व्हिडिओ ठरला आहे. हरीहरन यांनी गायिलेल्या आणि ललित सेन यांनी संगीतबद्ध केलेल्या या हनुमान चालिसाने (Hanuman Chalisa) जागतिक स्तरावरील सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओंच्या यादीतही स्थान मिळवले आहे. दि. १० मे २०११ रोजी प्रदर्शित झालेल्या सदर व्हिडिओमध्ये टी-सीरिजचे गुलशन कुमार हे देखील दिसतायत.(Hanuman Chalisa)
 
हेही वाचा :  जगातल्या सर्वात मोठया प्रभू रामाच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार अनावरण
 
टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांनी याबाबत कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, हनुमान चालीसाने (Hanuman Chalisa) लाखोंच्या हृदयात विशेष स्थान प्राप्त केले आहे. गुलशन कुमार यांनी अध्यात्मिक संगीत घरोघरी पोहोचवण्यासाठी आपले आयुष्य व्यतीत केले. हा मैलाचा दगड त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष आहे. ५ अब्ज व्ह्यूज ओलांडणे आणि युट्यूब वरील सर्वकालीन टॉप १० व्हिडिओंमध्ये स्थान मिळवणे हे केवळ डिजिटल यश नसून या देशातील लोकांच्या अखंड भक्तीचे प्रतीक आहे.
 
जागतिक स्तरावर, यादीत बेबी शार्क डान्स (१६.३८ अब्ज), डेस्पासितो (८.८५ अब्ज), व्हील्स ऑन द बस (८.१६ अब्ज) यांसारखे व्हिडिओ आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर श्री हनुमान चालीसा हा जगातील सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओंच्या अत्यंत प्रतिष्ठित जागतिक समूहात स्थान मिळवणारा भारताचे प्रतिनिधीत्व करणारा व्हिडिओ ठरला आहे.(Hanuman Chalisa)
 
 
Powered By Sangraha 9.0