Doctor terror module : दहशतवादी डॉ. मुझम्मिलचा अड्डा सापडला! 3BHK फ्लॅट आणि...

27 Nov 2025 17:20:26
 DOCTOR TERRERE MODULE
 
मुंबई : (DOCTOR TERRERE MODULE) दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार स्फोटानंतर, अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. त्यानंतर हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. देशभरात अनेक कारवाया करण्यात आल्या त्यानंतर आता एनआयएला या हल्ल्यातील एक प्रमुख आरोपी असलेल्या दहशतवादी डॉ. मुझम्मिलचा अड्डा सापडला आहे. मुझम्मिलने एक 3BHK फ्लॅट भाड्याने घेतला होता, याचा वापर ते स्फोटके साठवण्यासाठी आणि स्फोटाची योजना आखण्यासाठी करत होते. (DOCTOR TERRERE MODULE)
 
हेही वाचा :  जगातल्या सर्वात मोठया प्रभू रामाच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार अनावरण
 
दरम्यान माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, हे घर बघण्यासाठी दहशतवादी डॉ. मुझम्मिलसोबत त्यांच्याच मॉड्यूलमधील डॉ. शाहीन शाहीद गेली होती. ते स्फोटके साठवण्यासाठी या घरासोबतच आणखी दोन ठिकाणांचा वापर करत होत. त्यातील पहिल ठिकाण म्हणजे, अल फलाह विद्यापीठाशेजारील शेत. शेतात बनवलेल्या एका खोलीत, १२ दिवसांपासून सुमारे २५४० किलो स्फोटके साठवून ठेवण्यात आली होती. त्यानंतर ही स्फोटके कोणाला सापडतील या भीतीने फतेहपुरा तागा गावातील इमाम इश्तियाक यांच्या जुन्या घरात हलवण्यात आले होते. (DOCTOR TERRERE MODULE)
 
 
Powered By Sangraha 9.0