Thackeray brothers : ठरता ठरता ठरेना; ठाकरे बंधूंची पुन्हा भेट

27 Nov 2025 18:04:05
Thackeray brothers
 
मुंबई : (Thackeray brothers) उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Thackeray brothers) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Thackeray brothers) यांची शिवतीर्थावर भेट घेतली. मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाच्या अनुषंगाने ही भेट घेतल्याचे समजते. (Thackeray brothers)
 
नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणूका तोंडावर आहेत. त्यानंतर लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकांच्याही तारखा जाहीर होतील. त्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रचाराचा जोर वाढला असून मतदार यादी, उमेदवार, वॉर्ड, संघटन यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. (Thackeray brothers)
 
हेही वाचा : Abhinav Goyal : संविधान मुलांपर्यंत पोहोचल्यास राष्ट्र अधिक सक्षम नागरिक घडवेल - अभिनव गोयल
 
दरम्यान, गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही भावांमध्ये जवळपास २ तास चर्चा झाल्याचे समजते. मुंबई महापालिकेच्या जागावाटपासंदर्भात ही भेट असल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी ७५ ते ८० जागा मनसेला हव्या आहेत. यापूर्वीसुद्धा उबाठा गट आणि मनसेच्या नेत्यांमध्ये चर्चेचा पहिला टप्पा पार पडला असल्याचे समजते. (Thackeray brothers)
 
त्यानंतर आता पुन्हा एकदा स्वत: ठाकरे बंधूंमध्ये (Thackeray brothers)जागावाटपाच्या वाटाघाटी झाल्याची चर्चा आहे. युतीची घोषणा करण्याआधी हा आपसासातील पेच सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांची धडपड सुरु आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसने मनसेसोबत यूती करण्यास नकार दिल्याने महाविकास आघाडीचे भविष्य अधांतरी आहे. (Thackeray brothers)
 
Powered By Sangraha 9.0