मुंबई : (Lord Shri Ram Statue) अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमीवरील भव्य मंदिरावरील ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्वांचे गोव्याच्या दिशेने लक्ष लागले आहे. कारण दक्षिण गोव्यातील गोकर्ण जीवोत्तम मठात प्रभू श्रीरामाच्या ७७ फुट उंच कांस्य पुतळ्याचे(Lord Shri Ram Statue) अनावरण केले जाणार आहे. शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:४५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पुतळ्याचे अनावरण होईल.(Lord Shri Ram Statue)
मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्रीनिवास डेम्पो यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचे लोह पुरूष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटी डिझाईन करणारे शिल्पकार राम सुतार यांनीच गोव्यातील प्रभू रामाचा हा भव्य पुतळा घडवला आहे. प्रभू श्रीरामाचा हा पुतळा (Lord Shri Ram Statue) जगातला सर्वात उंच पुतळा असणार आहे.
हेही वाचा : Dr. Babasaheb Ambedkar : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण” – मुख्यमंत्री फडणवीस
पंतप्रधान मोदी शुक्रवारी दुपारी विशेष हेलिकॉप्टर द्वारे मठ परिसरात पोहोचतील. त्यांच्यासोबत गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि अनेक कॅबिनेट मंत्री उपस्थित राहतील. गोव्याचा हा ऐतिहासिक मठ ५५० वर्षे पुरातन आध्यात्मिक इतिहासाचे प्रतीक आहे. २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत दररोज ७,००० ते १०,००० भाविक येण्याची शक्यता आहे.(Lord Shri Ram Statue)