नवी दिल्ली/मुंबई : (Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत आज महाराष्ट्रातील परिवहन व्यवस्थेत सुलभता आणि गतिमानता मिळण्यासाठी महत्वपूर्ण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यावेळी रेल्वे मंत्रालयाच्या एकूण सुमारे २,७८१ कोटी रुपये खर्चाच्या दोन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. तर पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या जाळे अधिक विस्तारण्यात येणार असून पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला मार्गिका ४ आणि नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग या मार्गिका ४ अच्या कार्याला मंजुरी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'महाराष्ट्र सुपरफास्ट' म्हणत केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. (Narendra Modi)
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार,दि.२६ नोव्हेंबर रोजी आर्थिक विषयक कॅबिनेट समितीची बैठक झाली. या बैठकीत रेल्वे मंत्रालयाच्या दोन महत्त्वपूर्ण मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांची एकूण किंमत सुमारे २,७८१ कोटी असून त्यातून महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. या दोन प्रकल्पात देवभूमी द्वारका(ओखा)–कानालूस मार्गिका (१४१किमी)चे दुहेरीकरण करण्यात येईल. तर बदलापूर–कर्जत तिसरी आणि चौथी मार्गिका यात ३२ किलोमीटर रेल्वे मार्गिकेच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली आहे. या दोन प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमधील ४ जिल्ह्यांचा समावेश आहे. हे दोन्ही प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेच्या सध्याचे जाळे सुमारे २२४ किलोमीटरने विस्तारणार आहे. मंजूरी मिळालेल्या या बहुमार्गिका प्रकल्पांमुळे सुमारे ३२ लाख लोकसंख्या असलेल्या अंदाजे 58 गावापर्यंत दळणवळणीय जोडणीचा विस्तार होणार आहे. (Narendra Modi)
हेही वाचा : Ram Mandir Dhwajarohan : अयोध्येत ध्वजारोहणाचा उत्साह; प.बंगालमध्ये कट्टरपंथीयांची बाबरी समर्थनार्थ पोस्टरबाजी
कानालूस ते ओखा (देवभूमी द्वारका) पर्यंत मंजूर झालेल्या दुहेरीकरणामुळे द्वारकाधीश मंदिरासाठी अधिक चांगली दळणवळणीय जोडणी उपलब्ध होईल. यामुळे या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोचणे सुलभ होईल तसेच सौराष्ट्राशी जोडलेल्या प्रदेशाचाही सर्वांगीण विकास घडून येईल. बदलापूर – कर्जत विभाग हा या प्रकल्पांतर्गतचा मुंबई उपनगरीय कॉरिडॉरचा एक भाग आहे. तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पामुळे मुंबई उपनगरीय भागातील दळणवळणीय जोडणीत सुधारणा घडून येईल, तसेच प्रवाशांच्या दृष्टीने भविष्यातील मागणीही पूर्ण करता येईल. यासोबतच यामुळे दक्षिण भारतासोबतच्या दळणवळणीय जोडणीची सुविधाही मिळू शकेल. (Narendra Modi)
पुणे मेट्रोचा १०० किलोमीटरचा टप्पा पार
पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या जाळे अधिक विस्तारण्याच्यादृष्टीने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला मेट्रो मार्गिका ४ आणि मेट्रो मार्गिका क्र ४अ अंतर्गत नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग यांच्या कार्याला मंजुरी दिली आहे. एकूण २८ उन्नत स्थानकांसह एकूण ३१.६३ किमी विस्तार असलेल्या या दोन मेट्रो मार्गिका पुण्याच्या पूर्व, दक्षिण आणि पश्चिम भागांतील माहिती तंत्रज्ञान केंद्रे, व्यावसायिक विभाग, शैक्षणिक संस्था आणि निवासी समूह यांना परस्परांशी जोडतील. हा प्रकल्प येत्या पाच वर्षांत पूर्ण केला जाणार असून त्यासाठी ९,८५७.८५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. खराडी आयटी पार्क ते खडकवासल्याचा निसर्गरम्य पर्यटक पट्टा आणि हडपसरमधील औद्योगिक केंद्र ते वारज्यातील निवासी समूह यांना जोडणाऱ्या या मार्गिका पुण्यातील विविध भागांना एकत्र जोडतील. सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, सिंहगड रस्ता, कर्वे मार्ग आणि मुंबई-बेंगळूरू महामार्ग या रस्त्यांवरून जाणारा हा प्रकल्प सुरक्षिततेत वाढ करत आणि हरित, शाश्वत वाहतुकीला चालना देत पुण्यातील सर्वात वर्दळीच्या मार्गांवर होणारी वाहतूक कोंडी कमी करेल. हा प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल महामंडळातर्फे (महा-मेट्रो) राबवण्यात येणार आहे. या मंजुरीमुळे पुण्यातील मेट्रोच्या (Narendra Modi) जाळ्याचा विस्तार १०० किमीचा टप्पा पार करेल. (Narendra Modi)