Ladki Bahin Yojana : ‘देवाभाऊ’ जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मुख्यमंत्र्यांचा लाडक्या बहिणींना शब्द

26 Nov 2025 16:44:34
Ladki BAHIN YOJANA
 
मुंबई : (Ladki Bahin Yojana) राज्यात विधानसभा निवडणुकांवेळी चर्चेत ठरलेली लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही चर्चेत येताना दिसत आहे. महायुती सरकारने सुरू केलेली ही लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) बंद होणार असल्याचे विरोधक सातत्याने बोलत आहेत. मात्र ही लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अद्यापही सुरू आहे. यावरूनच आता लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी लाडकी बहीण योजना बंद होऊ न देण्याचा शब्द दिला आहे.
 
मुख्यमंत्र्यांचा लाडक्या बहिणींना शब्द
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची दिनांक २५ रोजी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, की आम्हाला विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला. आमच्या महाराष्ट्रातील विजयाला २३ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. मात्र आमच्या या दणदणीत विजयानंतर काही लोक म्हणायचे, की यांनी निवडणुकीपूर्वी जे घोषित केले होते, ते आता बंद करतील. काही लोक सांगायचे, की आता लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) बंद होणार. पण एक वर्ष झाले ही योजना आम्ही सुरूच ठेवली. ती बंद केली नाही. आणि माझ्या बहिणींना सांगतो की जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे. तोपर्यंत लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) कधीच बंद होणार नाही. लाडक्या बहिणींची ही योजना सुरूच राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
 
शेतकऱ्यांनाही मोफत वीज
 
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मोफत वीजबिलाबाबत भाष्य केले. ते म्हणाले की आपल्या शेतकऱ्यांना आपण मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय सुरूच आहे. तो निर्णय आम्ही बंद केला नाही. आणि त्यासोबत सोलरच्या माध्यमातून चोवीस तास वीज देण्याचाही निर्णय घेतला आहे.
 
Powered By Sangraha 9.0