आयटीआर परतफेडीत विलंबाची कारणे आणि करदात्यांना स्थिती आता 'येथे' तपासता येणार...

26 Nov 2025 18:22:52
 
ITR Refund
 
मुंबई : ( ITR Refund ) दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही लाखो करदात्यांनी त्यांचे आयटीआर दाखल केले आहेत. यातील बहुतेक करदात्यांना त्यांचे परतावे मिळाले आहेत, परंतु काही करदात्यांना अजूनही परतावे मिळाले नाहीत. यामुळे आयटीआर परतफेडीत विलंबाची कारणे देण्यासाठी आणि करदात्यांना स्थिती तपासता यावी यासाठी आयकर विभागाने दोन ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहेत.
 
यात पहिली साइट म्हणजे इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टल आणि NSDL (TIN) चे रिफंड स्टेटस पेज आणि दुसरे NSDL (TIN) चे रिफंड स्टेटस साइट. हया दोन्ही साइटवर पॅन कार्डच्या मदतीने आता करदात्यांना स्थिती तपासता येणार आहे. चुकीचा IFSC कोड, बँक खाते पूर्व-प्रमाणित नसणे व पॅन-आधार लिंक न होणे यासारख्या चुकीमुळे परतावा मिळण्यास विलंब होतो.
 
इन्कम टॅक्स पोर्टलवर रिफंड स्टेटस कसे तपासावे?
 
आयकर ई-फायलिंग वेबसाइट
 
१) अधिकृत वेबसाइटला www.incometax.gov.in भेट द्या.
 
२) पॅन, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा.
 
३) होम पेजवर, ई-फाइल → इन्कम टॅक्स रिटर्न → फाइल केलेले रिटर्न पहा वर क्लिक करा.
 
४) येथे वर्षानुसार दाखल केलेल्या रिटर्नची यादी तसेच प्रत्येक मूल्यांकन वर्षाची परतफेड स्थिती देखील दिसेल.
 
NSDL (TIN) वेबसाइट
 
१) TIN-NSDL रिफंड स्टेटस वेबसाइट भेट घा.
 
२) पॅन कार्ड नंबर एंटर करा आणि कर निर्धारण वर्ष निवडा.
 
३) पुढे जा बटण दाबा, सध्याची परतफेड स्थिती लगेच दिसेल.
 
परतफेड येण्यासाठी साधारण किती वेळ लागतो?
 
ई-व्हेरिफिकेशननंतर साधारणपणे ४-५ आठवड्यांच्या आत तुमच्या बँक खात्यात परतफेड जमा होते. जर परतफेड निधी मिळाला नाही तर बँक तपशील, आयएफएससी कोड, पॅन-आधार लिंक व बँक खात्यावरील जुळणारे नाव याची पुन्हा तपासणी करावी.
 
Powered By Sangraha 9.0