मुंबई : ( Food Poisoning ) छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. समाजकल्याण वसतीगृहाच्या जेवणात पाल आढळल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. वसतीगृहातील विद्यार्थी जेवत असताना, मेस क्रमांक एकवरील विद्यार्थ्यांच्या ताटातील गवारच्या भाजीत ही पाल आढलली आहे.
त्यानंतर थोड्याच वेळात जेवून झालेल्या विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. या जेवनामुळे तब्बल २८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे, त्यांतर लगेचच त्यांना घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : China : चीनकडून पुन्हा एकदा भारतीय सार्वभौमत्त्वाचा अपमान
दरम्यान, या सर्व प्रकारानंतर संतप्त विदयार्थ्यांंनी वसतिगृहासमोर रात्री साडेअकरा पर्यंत ठिय्या आंदोलन केले. सहाय्यक आयुक्त आर. एम. शिंदे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत, संबंधित मेस चालकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.