मुंबई : (Ram Mandir Dhwajarohan) अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरावर मंगळवारी झालेल्या ध्वजारोहणामुळे (Ram Mandir Dhwajarohan) पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. भारताच्या पूर्णपणे अंतर्गत आणि धार्मिक स्वरूपाशी संबंधित प्रकरणात पाकिस्तानने अनावश्यक हस्तक्षेप केला असून. पाकिस्तानने अयोध्येत बांधण्यात आलेल्या मंदिराबाबत (Ram Mandir Dhwajarohan) तीव्र चिंता व्यक्त केली. पाकिस्तानने याबाबत एक निवेदन जारी करून राम मंदिराच्या बांधकामावर टीका केली. पाकिस्तानने त्याला बाबरी मशीद परिसरावर उभारलेले ‘तथाकथित मंदिर’ असे संबोधत गरळ ओकल्याचे दिसून येत आहे. (Ram Mandir Dhwajarohan)
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयद्वारा ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनातून आरोप केलाय की भारताच्या न्यायिक प्रक्रियांनी अल्पसंख्याकांविरुद्ध भेदभावाला प्रोत्साहन दिले आहे. पाकने असा दावा केला की भारतात ‘हिंदुत्व विचारधारे’च्या प्रभावाखाली मुस्लिम वारशाला मिटवण्याचा प्रयत्न होत आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाला भारतातील ‘वाढत्या इस्लामोफोबिया’कडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. तसेच अल्पसंख्याकांच्या धार्मिक अधिकारांचे संरक्षण सुनिश्चित करण्याची मागणी भारत सरकारकडे केली आहे. (Ram Mandir Dhwajarohan)
हेही वाचा : Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावरील ध्वजारोहणानंतर पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या! भारतीय मुस्लिमांविषयी सतावतेय चिंता
पाकिस्तानने मंदिराच्या बांधकामावर टीका करत विविध आरोप लावले असले, तरी भारताने हे आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. भारताचा स्पष्ट संदेश असा आहे की पाकिस्तानने इतर देशांच्या अंतर्गत धार्मिक विषयांवर टिप्पणी करण्याऐवजी स्वतःच्या गंभीर अंतर्गत समस्यांकडे लक्ष द्यावे. त्यामुळे हा वाद मुख्यतः पाकिस्तानच्या राजकीय हेतूंनी प्रेरित प्रतिक्रिया असल्याचे दिसून येते. (Ram Mandir Dhwajarohan)