Commonwealth Games 2030 : २०३०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भारतालाच, अहमदाबादमध्ये पार पडणार शंभरावी स्पर्धा

26 Nov 2025 20:36:06
 
Commonwealth Games 2030
 
मुंबई : (Commonwealth Games 2030) भारताला महिन्याभरापूर्वीच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळणे जवळपास निश्चितच झाले होते. मात्र बुधवार दि. २६ नोंव्हेंबर रोजी 'ग्लासगो' येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा महासभेत ७४ राष्ट्रकुल सदस्य देश आणि प्रदेशांच्या प्रतिनिधींनी भारताची निवड केली आहे. त्यामुळे २०३० च्या शतकोत्तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे (Commonwealth Games 2030) यजमान म्हणून भारतातील अहमदाबाद शहराला अधिकृतपणे मान्यता देण्यात आली आहे.
 
या ऐतिहासिक क्षणाबद्दल आनंद व्यक्त करताना, कॉमनवेल्थ गेम्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा पीटी उषा म्हणाल्या, "कॉमनवेल्थ स्पोर्टने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्हाला खूप आदर आहे. २०३० चे खेळ केवळ कॉमनवेल्थ चळवळीची १०० वर्षे साजरी करणार नाहीत तर पुढील शतकाचा पायाही रचतील. ते खेळाडू, समुदाय आणि संस्कृतींना मैत्री आणि प्रगतीच्या भावनेने एकत्र आणतील." (Commonwealth Games 2030)
 
हेही वाचा :  Narendra Modi : महाराष्ट्राला मोदी सरकारची मोठी भेट! पुण्यात मेट्रो तर मुंबईत उपनगरीय रेल्वे मार्गांना मंजुरी
 
भारताने शेवटचे २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे (Commonwealth Games 2030) आयोजन केले होते. तेव्हा दिल्लीत आयोजित केलेल्या या स्पर्धांमध्ये, भारतीय खेळाडूंनी १०१ पदक मिळवत इतिहास रचला होता. ज्यात ३८ स्वर्ण, २७ रजत आणि ३६ कांस्य पदकांचा समावेश होता. (Commonwealth Games 2030)
 
दरम्यान, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games 2030) पहिल्यांदा १९३० मध्ये कॅनडाने आयोजित केल्या होत्या. आता २०३० मध्ये भारतातील अहमदाबाद येथे १०० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणार आहे. त्यासोबतच, ग्लासगोमध्ये होणारी २०२६ ची स्पर्धा बजेट नियंत्रणात ठेवण्यात आल्यामुळे त्यातून, कुस्ती, नेमबाजी, बॅडमिंटन आणि हॉकीसारखे महत्त्वाचे खेळ वगळण्यात आले आहेत. भारताची पदक जिंकण्याची क्षमता याच खेळांवर अवलंबून असल्याने भारताने या कपातीला कडाडून विरोध केला होता. मात्र, २०३० च्या स्पर्धेत ग्लासगोने वगळलेले सर्व खेळ समाविष्ट असतील, असे भारतीय कॉमनवेल्थ गेम्स असोसिएशन ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. (Commonwealth Games 2030)
 
 
Powered By Sangraha 9.0