China : चीनकडून पुन्हा एकदा भारतीय सार्वभौमत्त्वाचा अपमान

26 Nov 2025 15:38:42
China
 
नवी दिल्ली : (China) अरुणाचल प्रदेश हा चीनचा (China) भाग असून, भारतीय पासपोर्ट चालाणार नसल्याचे सांगत, एका भारतीय तरुणीला चीनच्या (China) शांघाय विमानतळावर चिनी तपास अधिकाऱ्यांनी 18 तास थांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. अरुणाचल प्रदेशच्या पेमा वांग थोंगडोक या तरुणीने घडलेल्या सगळा प्रकार समाजमाध्यमांवर लिहिल्यानंतर चीनची दादागिरी उघडकीस आली.(China)
 
विस्तारवादासाठी कुप्रसिद्ध असलेल्या चीनचा (China) भारताच्या अरुणाचल प्रदेशवर सुरुवातीपासून डोळा आहे. चीनने (China) वारंवार या प्रदेशाला त्याचा भूभाग संबोधण्याची कृती याआधीही केली आहे. मात्र, शुक्रवार दि. 21 नोव्हेंबर रोजी चीनकडून पुन्हा एकदा भारताच्या सार्वभौमत्त्वाचा अपमान करण्यात आला. चीनने अरुणाचल प्रदेशमधील रहिवासी असलेल्या पेमा वांग थोंगडोक या भारतीय तरुणीला, अरुणाचल प्रदेश चीनचा (China) भाग असल्याचे सांगत 18 तास शांघाय विमानतळावर थांबवण्यात आले. चिनी अधिकाऱ्यांनी सातत्याने अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग मानण्यास नकार देताना, थोंगडोक यांच्याकडे चिनी पासपोर्टचीही विचारणा केल्याचेही त्यांना समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटले आहे.(China)
 
थोंगडोक या लंडनहून जपानला जात असताना, तीन तासांच्या थांब्यासाठी शांघाय पुडोंग विमानतळावर उतरल्या होत्या. या विमानतळावरील चिनी (China) इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून अरुणाचल प्रदेश चीनचा भाग (China) असल्याचे म्हणत, त्यांचा भारतीय पासपोर्ट अवैध ठरवण्यात आला. चीन (China) अरुणाचल प्रदेशला ‌‘जंगनान‌’ म्हणून आपला भूभाग मानत असल्याने, अधिकाऱ्यांनी थोंगडोक यांची भारतीय नागरिकता मान्य करण्यास नकार दिला.(China)
 
हेही वाचा : Gautam Gambhir : "भारतीय क्रिकेट महत्वाचे आहे, मी नाही" : गौतम गंभीर 
 
दरम्यानच्या 18 तासांच्या काळात चिनी (China) अधिकाऱ्यांची थोंगडोक यांच्याशी असलेली वागणूकही अपमानास्पदच होती. या काळात त्यांना अन्न, पाणी आणि त्यांच्या स्थितीविषयीची कोणतीही महितीही देण्यात आली नाही. तसेच, त्यांच्याकडे वैध जपानी व्हिसा आणि कागदपत्रे असून, त्यांना पुढील विमानाने प्रवास करण्यासाठी रोखण्यात आले. अखेर लंडन येथील परिचितांच्या साहाय्याने शांघाय येथील भारतीय वाणिज्यदूताशी संपर्क साधल्यानंतरच त्यांना विमानतळ सोडता आले. दरम्यानच्या काळात अनेकदा चिनी पासपोर्टसाठी अर्ज करण्याचा उपहासात्मक सल्लाही त्यांना चिनी अधिकाऱ्यांकडून देण्यात आला. या सगळ्यामुळे मोठे आर्थिक नुकसानही थोंगडोक यांना सहन करावे लागल्याचे त्यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटले आहे.(China)
 
दरम्यान, भारताने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, या घटनेला भारताच्या सार्वभौमत्त्वाचा अपमान असल्याचेही भारताने म्हटले आहे. अरुणाचल प्रदेश हा देशाच्या अभिन्न भाग होता आणि कायम राहिले असे वेळोवेळी जाहीर करण्यात आले आहे. थोंगडोक यांच्या घटनेमध्येही जबाबदारी निश्चित करुन कारवाई करण्याची आणि नुकसान भरपाई देण्याबाबत चीनला केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.(China)
 
विस्तारवादाचा चीनचा जुनाच रोग!
 
विस्तारवादाचा चीनला (China) जडलेला रोग जुनाच असून, त्याचे सीमाप्रश्नावरुन अनेक देशांबरोबर संघर्ष सुरु आहेत. भारताच्या अक्साई चीन (China) आणि संपूर्ण अरुणाचल प्रदेशवरच चीनचा (China) दावा असून, 27 ठिकाणांना चीनने चिनी भाषेत नावे दिली आहेत. यामध्ये 15 डोंगर, पाच नागरी वस्त्या, चार खिंडी, दोन नद्या आणि एका सरोवराचाही समावेश आहे. गलवान येथेही यापूव भारतीय आणि चिनी (China) सैन्याची विस्तारवादी वृत्तीविरोधात जोरदार लढाई झाली होती.(China)
 
 
Powered By Sangraha 9.0