कल्याण : (KDMC School) केडीएमसीच्या शाळेतील (KDMC School) विद्यार्थ्यांसाठी किडलेट ॲपच्या माध्यमातून अध्ययन आणि अध्यापन करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळा हायटेक होत असताना दिसून येत आहे. (KDMC School)
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांसाठी (KDMC School) यंदाचे वर्ष हे शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीचे वर्ष आहे .हे मिशन आणि व्हिजन घेऊन केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल , शिक्षण विभाग उपायुक्त संजय जाधव, प्रशासन अधिकारी भारत बोरनारे आणि शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी जून महिन्यापासूनच विद्यार्थी तसेच शिक्षक यांच्यासाठी विविध भौतिक तसेच शैक्षणिक सोयी सुविधा मोठ्या संख्येने पुरविण्यास सुरुवात केली आहे. शैक्षणिक गुणवत्ता विकास आणि त्यामधील सातत्याने वाढ हाच या सर्व उपक्रमांमागील मुख्य उद्देश होय. या अंतर्गतच महानगर गॅस यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत किडलेट ॲपच्या माध्यमातून लर्निंग इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 33 शाळांमध्ये सुरू करण्यात आला आहे. याचे प्राथमिक प्रशिक्षण शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी डोंबिवली येथील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 21, आयरे येथे संपन्न झाले. (KDMC School)
हेही वाचा : MHADA : एकल इमारतींच्या प्रस्तावांना म्हाडा आठवड्याभरात मंजुरी देणार
सदर प्रशिक्षणासाठी महानगर गॅस सीएसआर कमिटी सदस्या प्रियांका दळवी, देवेश तसेच किडलेट ॲपचे सागर बापट, हिना मळेकर तसेच मंदार अटकेकर या प्रतिनिधींनी प्रशिक्षण दिले. या उपक्रमाचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 33 शाळातील 65 शिक्षकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांना शिकविण्यात आलेला पाठ्य घटकाची आजच्या माध्यमातून बहुपर्यायी प्रश्न प्रकाराद्वारे पडताळणी कशी करायची याबाबत माहिती देण्यात आली. (KDMC School)
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेतील (KDMC School) विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीचे मूल्यांकन करण्यासाठी तसेच त्याद्वारे योजावयाच्या उपचारात्मक अध्यापनासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे. (KDMC School)