नाशिक : (Nirmala Gavit) त्र्यंबकेश्वर-इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित (Nirmala Gavit) यांचा भीषण अपघात झाला असून त्या गंभीर जखमी झाल्या असल्याची बातमी माध्यमांवरून मिळत आहे. सध्या त्यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निर्मला गावित (Nirmala Gavit) आपल्या घराबाहेर नातवाला घेऊन फिरत असताना पाठीमागून येणार्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून, ही पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे.
हेही वाचा : अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अंजिक्य देव यांची भन्नाट केमिस्ट्री
दरम्यान, निर्मला गावित (Nirmala Gavit) यांचा सोमवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी अपघात झाला. त्या घराच्या बाहेर नातवाला रस्त्यावर फिरवत असताना मागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. तसेच वाहनचालकाने काही फुटापर्यंत त्यांना फरफटत देखील नेले. या घटनेत सुदैवाने निर्मला गावित (Nirmala Gavit) या बचावल्या असल्या तरी त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
या अपघातातून बचावल्यानंतर माध्यमांशी बोलताना निर्मला गावित (Nirmala Gavit) म्हणाल्या, लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने अपघातातून बचावले, नातवासोबत वॉक करायला निघाले होते. अचानक मागून धड असा आवाज आला आणि मी बोनेटवर पजले. त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये आले. तेवढेच मला आठवत आहे. घटनेनंतर मला खुर्चीवर बसवले, असे सांगत आहेत. पण मला ते आठवत नाही. आता तब्येत व्यवस्थित आहे. अपघात झाला तेव्हा मला जास्त त्रास होत होता. मात्र योग्य उपचारानंतर आता मी बरी आहे. (Nirmala Gavit)