Mumbai Metro 3 route : तांत्रिक कारणामुळे सिद्धीविनायक स्थानकावर मेट्रो खोळंबली

25 Nov 2025 20:38:47
Mumbai Metro 3 route
 
मुंबई : (Mumbai Metro 3 route) 'कफ परेड-वांद्रे-सीप्झ-आरे' मुंबई मेट्रो ३ मार्गिकेवर (Mumbai Metro 3 route) ऐन गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा झाला. आरे जेव्हीएलआरवरुन कफ परेडला जाणारी गाडी सिद्धिविनायक स्थानकात तांत्रिक कारणांमुळे बंद पडली. गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याचे समजताच मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या (एमएमआरसी) अधिकारी-कर्मचार्यांनी धाव घेत समस्या दूर केली आणि त्यानंतर ही गाडी पुढे गेली.(Mumbai Metro 3 route)
 
मेट्रो ३ मार्गिकेमुळे मुंबईकरांचा आरे ते कफ परेड प्रवास अतिजलद आणि सुकर झाला आहे. त्यामुळे मेट्रो ३ मार्गिकेला (Mumbai Metro 3 route) प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत मेट्रो ३ मार्गिकेवर (Mumbai Metro 3 route) प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र अशावेळी मंगळवार,दि.२५ रोजी आरे जेव्हीएलआरवरुन कफ परेडला निघालेली मेट्रो गाडी ऐन गर्दीच्या वेळेस सकाळी १०च्या सुमारास सिद्धीविनायक मेट्रो स्थानकावर पोहचली आणि गाडी अचानक बंद पडली.(Mumbai Metro 3 route)
 
हेही वाचा : Tejashree Karanjule : तेजश्री करंजुले यांचा प्रचार जोरदार
 
गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्याबरोबर एमएमआारसीच्या अधिकारी-कर्मचार्यांनी गाडीतील तांत्रिक बिघाड दूर केला आणि त्यानंतर गाडी कफ परेडच्या दिशेने मार्गस्थ झाली. मात्र यात १० मिनिटांचा अवधी गेल्याची माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली आहे. गाडी १० मिनिटे सिद्धिविनायक स्थानकावर (Mumbai Metro 3 route) थांबल्याने आरे जेव्हीएलआर ते कफ परेड डाऊन मार्गावरील गाड्यांचा खोळंबा झाला. पुढे काही वेळ गाड्या ५ ते १० मिनिटे उशिरा धावत होत्या, मात्र त्यानंतर दुपारी वाहतूक सुरळीत झाली.(Mumbai Metro 3 route)
 
 
Powered By Sangraha 9.0