Lord Buddha Prerna Puraskar 2025 : मुंबईत संविधान दिनानिमित्त ‘लॉर्ड बुद्धा प्रेरणा पुरस्कार 2025’; बुध्दभीम गीतांचा सुरेल जल्लोष

25 Nov 2025 14:45:00
Lord Buddha Prerna Puraskar 2025
 
मुंबई : (Lord Buddha Prerna Puraskar 2025) भारतीय संविधान दिनानिमित्त आणि लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन नेटवर्कच्या १५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ‘लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन नेटवर्क 2025’ (Lord Buddha Prerna Puraskar 2025) हा सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट येथे बुधवार २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.(Lord Buddha Prerna Puraskar 2025)
 
आंबेडकरी विचारधारेचे पहिले इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणून लॉर्ड बुद्धा टीव्हीने गेल्या १५ वर्षांत धम्म प्रचार-प्रसार, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय धम्म परिषदा, परिसंवाद, बुध्दभीम गीतांचा प्रसार आणि सामाजिक जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. बोधगया महाविहार प्रश्न, भीमा कोरेगाव आदी विषयांवरही या वाहिनीने मोठी चळवळ उभारली आहे.(Lord Buddha Prerna Puraskar 2025)
 
हेही वाचा : Amit Satam : आमदार अमीत साटम यांच्या मार्गदर्शनात धर्म ध्वजाचे वितरण
 
आंबेडकरी विचार, सामाजिक समता आणि मानवतावादी मूल्यांसाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना ‘लॉर्ड बुद्धा प्रेरणा पुरस्कार 2025’ (Lord Buddha Prerna Puraskar 2025) प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार प्राप्तांमध्ये जया बनसोडे, योजना ठोकळे, स्नेहा भालेराव, छाया खंडागळे, सुनील भोले, सुनील तायडे, उद्योजक राजकुमार सिंग, कृष्णमुर्ती दासरी, साक्षी दरेकर, कुणाल बबन कांबळे यांचा समावेश आहे.(Lord Buddha Prerna Puraskar 2025)
 
या कार्यक्रमात सारेगामापा विजेती छाया आकांशा यांचे बुद्ध-भीम गीतांचे लाइव्ह इन कॉन्सर्ट सादर होणार आहे.
प्रमुख पाहुण्यांमध्ये भदंत हर्षबोधी (बोधगया), माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार सिद्धार्थ खरात, यामिनी जाधव, माजी मंत्री विजय गिरकर, दीपक कदम, चित्रपट निर्माते अनुभव सिन्हा व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.(Lord Buddha Prerna Puraskar 2025)
 
या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संस्थापक संचालक सचिन मून यांनी केले आहे.(Lord Buddha Prerna Puraskar 2025)
 
 
Powered By Sangraha 9.0