Dr. Anil Kakodkar : वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासणे महत्वाचे : पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर

25 Nov 2025 19:21:19
 
Dr. Anil Kakodkar
 
मुंबई : (Dr. Anil Kakodkar) “इनोव्हेशन स्किल हा शब्द वापरण्यापेक्षा त्याचा मुळ गाभा समजून घेणे अत्यावश्यक आहे. आपण वैज्ञानिक दृष्टीकोन जोपसणे महत्वाचे आहे. फक्त विज्ञान शिकून वैज्ञानिक दृष्टिकोन मिळत नाही, विचारांची पद्धत वैज्ञानिक असणे महत्त्वाचे आहे. समाजाची प्रगती केवळ ज्ञानाने नव्हे तर तर्कशुद्ध विचारांनीच होते." असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. (Dr. Anil Kakodkar)
 
दि. २५ नोव्हेंबर रोजी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छबिलदास हायस्कूल, दादर आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “नवनिर्मिती विचार क्षमता निर्माण करणे” या अभिनव उपक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा आज उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर (Dr. Anil Kakodkar) यांनी केले . डॉ. काकोडकर (Dr. Anil Kakodkar) यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांमधील परीक्षणाची तयारी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले. पद्मभूषण प्रा. ज्येष्ठराज जोशी यांनी नवकल्पनांची खोली समजून घेण्यावर भर देत, “उत्तर शोधायचे असेल तर विषयाच्या मुळाशी पोहोचणे आवश्यक आहे. इनोव्हेशन म्हणजे कल्पनेला शेवटपर्यंत नेण्याची क्षमता,” असे मत व्यक्त केले.(Dr. Anil Kakodkar)
 
हेही वाचा : भरत जाधव-महेश मांजरेकर पहिल्यांदाच रंगभूमीवर येणार एकत्र  
 
यावेळी डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी विद्यार्थ्यांनी विकसित करावयाच्या प्रमुख कौशल्यांचा उल्लेख करताना सांगितले की, “कुतूहल, प्रत्यक्ष प्रयोग करण्याचे धाडस, वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पनाशक्ती, निर्णय क्षमता, निर्मितीशीलता, परीक्षणाची वृत्ती आणि ‘अंत्योदय ते सर्वोदय’ ही विनोबा भावे यांनी सुचविलेली एकात्म दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये जागी झाली पाहिजे.” GEI चे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी यांनी संस्थेमार्फत या उपक्रमासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन दिले. तर उपाध्यक्ष डॉ. सुधीर पानसे यांनी विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीक्षम विचार, सखोल ज्ञान आणि जागरूकतेचे वातावरण निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. “नवीन गोष्ट सुरुवातीला कठीण वाटते, पण सातत्य ठेवल्यास ती परिपूर्ण होते,” असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. रविंद्र तामरस, उपकार्यवह महेश केळकर, संचालक मंडळाचे सदस्य, पदाधिकारी, जनरल एज्युकेशन व दादर परिसरातील विज्ञान शिक्षक तसेच छबिलदास इंग्लिश व मराठी माध्यमातील विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाचे नियोजन कार्यवाह विकास पाटील यांनी केले. सुत्रसंचालन अर्चना इशी व समृद्धी जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन रुपेश गायकवाड यांनी मानले.(Dr. Anil Kakodkar)
 
Powered By Sangraha 9.0