Guru Tegh Bahadur : धर्म रक्षणासाठी गुरु तेग बहादुर यांचे बलिदान आपल्यासाठी जगण्याचा संदेश

25 Nov 2025 13:32:33
Guru Tegh Bahadur
 
मुंबई : (Guru Tegh Bahadur) सनातन धर्म त्याग आणि बलिदानावर उभा आहे. सदैव प्रेरणा देणारे जीवनमूल्यांचे आदर्श आपल्या समाजात आहेत. धर्म, न्याय, मानवी मूल्ये आणि अधिकारांचे रक्षण करण्यासाठी श्री गुरु तेग बहादुरजींनी (Guru Tegh Bahadur)  दिलेले बलिदान हे आपल्यासाठी जगण्याचा संदेश आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. सोमवारी श्री गुरु तेग बहादुरजी (Guru Tegh Bahadur) यांच्या ३५० व्या बलिदान दिवसानिमित्त गुरुद्वारा ब्रह्मकुंड साहिब येथे माथा टेकून त्यांच्या अमर त्याग व बलिदानाचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते. (Guru Tegh Bahadur)
 
सरसंघचालक पुढे म्हणाले, गुरु महाराजांची परंपरा अशा काळात होती, जेव्हा हा प्रश्न होता की धर्म राहील की नाही. तरीसुद्धा धर्म टिकला. धर्मासाठी जीवन कसे असावे हे गुरु महाराजांनी (Guru Tegh Bahadur) प्रत्यक्ष जगून दाखवले, फक्त सांगितले नाही. आपल्याला कोणी धान्य-पाणी देते तर आपण कृतज्ञ होतो, पण कोणी आपले जीवन कसे असावे हे ज्ञान देते, तर संपूर्ण समाज शाश्वत काळासाठी ऋणी राहतो; जोपर्यंत हे जीवन आहे तोपर्यंत. एकाच वेळी सर्व परिवर्तन होणार नाही, परंतु हळूहळू समाज त्यांचा आदर्श स्वीकारत जाईल आणि जीवनात परिवर्तन घडवेल. (Guru Tegh Bahadur)
 
हेही वाचा : बौद्धांचे धर्मांतरण रोखण्यासाठी... 
 
गुरुद्वाराचे मुख्य ग्रंथी ज्ञानी गुरजीत सिंह खालसा यांनी सरसंघचालकांना सरोपा देऊन त्यांचे स्वागत केले. ते म्हणाले की अयोध्येतील राममंदिराचे निर्माण संपूर्ण जगातील सनातनी समाजाच्या स्वप्नाची पूर्तता आहे. या प्रसंगी गुरुद्वारा ब्रह्मकुंड साहिबच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल माहिती देताना प्रमुख ग्रंथीजींनी सांगितले की, या गुरुद्वारात प्रथम पातशाही गुरु नानक देवजी, गुरु तेग बहादुरजी (Guru Tegh Bahadur) आणि दशम पातशाही गुरु गोविंद सिंह यांचे आगमन झाले होते. (Guru Tegh Bahadur)
 
Powered By Sangraha 9.0