ठाण्यातील आकाशात दुर्मीळ गिधाडाच्या घिरट्या; येऊरमध्ये झाले दर्शन

25 Nov 2025 21:29:29
egyptian vulture in thane



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
ठाण्यातील आकाशात मंगळवार दि. २५ नोव्हेंबर रोजी दुर्मीळ गिधाड घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले (egyptian vulture in thane). येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिक्षेत्रातील मानपाडा येथे पक्षीनिरीक्षकांना गिधाडाचे दर्शन घडले (egyptian vulture in thane). हे गिधाड संकटग्रस्त असणाऱ्या इजिप्शियन प्रजातीचे होते. हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेशात पक्ष्यांचे स्थलांतर सुरू झाले असून अनेक दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन सध्या घडत आहे. (egyptian vulture in thane)
 
 
हिवाळ्यात मुंबई महानगर प्रदेशात गिधाडांच्या काही प्रजाती प्रामुख्याने दिसतात. यामध्ये स्थलांतर करणाऱ्या गिधाडांचा समावेश असतो. ज्यामध्ये युरेशियन ग्रिफाॅन, हिमालयीन गिफ्राॅन या प्रजाती आकाशात घिरट्या घालताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील मानपाडा वनपरिक्षेत्रामध्ये इजिप्शियन गिधाडाचे दर्शन मंगळवारी घडले. पक्षीनिरीक्षक सत्यान नायर हे मानपाडा निसर्ग परिचय केंद्राच्या वनपरिक्षेत्रात पक्षीनिरीक्षणाकरिता गेले होते. त्यावेळी त्यांना आकाशात काही घारी या एका पक्ष्याचा पाठलाग करत असल्याचे दिसले. नायर यांनी लागलीच या पक्ष्यांची छायाचित्र टिपली. छायाचित्र तपासल्यानंतर त्यांना हा पक्षी इजिप्शियन गिधाड असल्याचे लक्षात आले.
 
इजिप्शियन गिधाडाला मराठीत पांढरे गिधाड असे म्हटले जाते. हे निओफ्रॉन जातकुळीतील एकमेव गिधाड आहे. ते दक्षिण युरोप, आफ्रिका आणि आशियात आढळते. याचा आकार घारीएवढा असतो. पूर्ण वाढ झालेल्या नर गिधाडांची लांबी ४७-५२ सेंमी तर मादींची लांबी ५२-५५.५ सेंमी असते. पंखांची लांबी शरीराच्या लांबीच्या २.७ पट असते. सगळे शरीर मळकट पांढर्‍या रंगाचे असते. डोके पिवळे असून त्यावर पिसे नसतात. चोच पिवळी असते. उडण्याच्या कामी उपयोगी पडणारी पिसे काळी असतात. तर शेपटी पाचरीसारखी, पंख लांब व टोकदार असतात. नर व मादी दिसायला सारखीच असतात. हे पक्षी एक-एकटे किंवा जोडप्याने राहतात.
Powered By Sangraha 9.0