मुंबई : (White Collar Terror Module) दिल्ली कार स्फोटानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. व्हाइट कॉलर डॉक्टर दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश झाला. मात्र आता तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या दहशतवादी मॉड्युलमध्ये (White Collar Terror Module) सहभागी असलेल्या सर्व दहशतवाद्यांचं कट्टरपंथीकरण २०१९मध्ये सोशल मीडियाद्वारे सुरू झाले होते, असे माध्यमांकडून म्हटले जात आहे. (White Collar Terror Module)
हेही वाचा : अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
दरम्यान तपास यंत्रनांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून, उच्च शिक्षित व्यावसायिकांना पाकिस्तान व जगातील इतर भागांमध्ये असलेल्या दहशतवादी सूत्रधारांकडून दहशतवादी कारवायांसाठी तयार केले जात आहे आणि त्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर केले जात आहे. (White Collar Terror Module)
हे वाचलात का ?: हुमायूनचा ‘खयाली पुलाव’
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी मॉड्यूलचे (White Collar Terror Module) सदस्य, डॉ. मुझम्मिल गनई, डॉ. आदिल राथेर, डॉ. मुझफ्फर राथेर आणि डॉ. उमर-उन-नबी हे सीमेपलीकडील दहशतवाद्यांशी संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. तसंच, या दहशतवाद्यांना लगेचच टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडण्यात आले होते. या ग्रुपमध्येच त्यांचे ब्रेनवॉश करण्यात येत होते. तिथेच त्यांना कट्टरपंथीकरणाचे धडे देण्यात आले होते. त्यानंतर, त्यांना दहशतवादी हल्ले करण्यासाठी आयडी कशी बनवायची हे शिकवण्यासाठीही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करण्यात आला होता. (White Collar Terror Module)