Devendra Fadnavis : मोदीजींची दृष्टी आणि व्हिजन आपल्या शहरांपर्यंत आणायचे आहे

24 Nov 2025 19:48:49
Devendra Fadnavis
 
नंदूरबार/जळगाव : (Devendra Fadnavis) मोदीजींच्या नेतृत्वात देशात विकासाचा झंझावात पाहायला मिळतो. देशात आणि राज्यात जनतेचा आशीर्वाद घेऊन विकासाची कास धरलेले सरकार कार्यरत आहे. आता नगरपालिकेतसुद्धा त्याच विचाराचे सरकार स्थापित करायचे आहे. मोदीजींची दृष्टी आणि त्यांचे व्हिजन आपल्या शहरांपर्यंत आणायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जनतेला केले.(Devendra Fadnavis)
 
विविध नगरपरिषदांचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आणि जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात त्यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, "लाडक्या बहिणींची ताकद ज्यांच्या पाठीशी आहे, त्यांना कुणीही हरवू शकत नाही. त्यामुळे याठिकाणी आमचा विजय सुनिश्चित आहे. नगरपालिकेच्या निवडणूकीत आपण आपल्या शहराच्या विकासाकरिता मतदान मागत असतो. भाजपच्या हातात नगरपालिका दिली तर आपले आमदार, मंत्री आणि मी पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीमागे उभे राहू."(Devendra Fadnavis)
 
हेही वाचा : Devendra Fadnavis : मुंबईतील वाहतुकीचा ३६० डिग्री कनेक्टिव्हीटी आराखडा तयार
 
...तर अर्धा महाराष्ट्र बदलू शकतो
 
"आज देशात मोदीजींच्या नेतृत्वात परिवर्तन होत असून शहरे बदलत आहेत. मोदीजींनी पहिल्यांदा आमच्या शहरांचा विकास व्हावा, ही भूमिका मांडली. शहरांमध्ये पाण्याची व्यवस्था, कचऱ्याचा निचरा, गटारीची व्यवस्था, रोजगार, आरोग्य, शिक्षण, निवारा अशा सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदा १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी शहरांच्या विविध योजनांसाठी उपलब्ध करून दिला. महाराष्ट्रातील साडे सहा कोटी लोक ४० हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच लोक ४०० शहरांमध्ये राहतात. अर्धी लोकसंख्या ही केवळ शहरांमध्ये राहते. तिथे लोकांचे जीवनमान उंचावले तर अर्धा महाराष्ट्र आपण बदलू शकतो," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.(Devendra Fadnavis)
 
सत्ता गाजवण्यासाठी नगरपालिका नको
 
"आम्हाला नगरपालिकेची सत्ता गाजवण्यासाठी किंवा केवळ खुर्च्या तोडण्याकरिता नको आहे. याठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात शहर विकासाच्या योजना हातात घेतल्या आहेत. शहरे कशी बदलू शकतात याची एक ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे आहे. आज अतिक्रमित लोकांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घरे आहेत पण पट्ट्यावर अडचणी असल्यामुळे पट्टा मिळू शकत नाही. यासाठी नुकताच सरकारने निर्णय घेतला असून यानुसार सगळ्या अतिक्रमणधारी घरांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय घेतला आहे. या मोठ्या सभेला मोठ्या विजयात परिवर्तित करा. २ तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या पुढच्या पाच वर्षांची जबाबदारी देवाभाऊ घेईल. २ तारखेला कमळाचे बटण दाबून दणदणीत विजय मिळवून द्या," असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जनतेला केले.(Devendra Fadnavis)
 
 
Powered By Sangraha 9.0