बॉलीवूडचा ही-मॅन, ६ दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा सुपरस्टार आणि ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अद्वितीय भूमिका साकारणारे आपले धर्मेंद्र.

मुंबईत कधी आले ?
पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यात जन्मलेले धर्मेंद्र लहानपणापासूनच अभिनयाशी जोडले गेलेले. मात्र १९५८ मध्ये Filmfare Talent Hunt जिंकल्यानंतर त्यांचं मुंबईत आगमन झालं.
अभिनय प्रवासाची सुरुवात...
१९६० साली ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून त्यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात झाली. साधं-सरळ व्यक्तिमत्त्व आणि कॅमेरा-फ्रेंडली स्क्रीन प्रेझेन्समुळे त्यांना प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करायला फार वेळही नाही लागला.
इंडस्ट्रीतील सर्वात हँडसम...
१९६०–७०च्या दशकात धर्मेंद्र यांना इंडस्ट्रीतील सर्वात हँडसम रोमॅंटिक हिरो म्हटलं जायचं. ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, ‘काजल’, ‘चुपके चुपके’ या चित्रपटांमधील त्यांची नाजूक, भावपूर्ण भूमिका आजही तेवढीच लोकप्रिय आहे.
'शोले'
'शोले'मधील वीरू एवढ्या वर्षांनंतर आजही अमर आहे. याच दशकात धर्मेंद्र यांनी स्वतःला अॅक्शन सुपरस्टार म्हणून सिद्ध केलं आणि स्टंट्स स्वतः करणाऱ्या मोजक्या अभिनेत्यांपैकी एक बनले.
स्टायलिश पण माणूसकी जपणारे
रोमान्स, अॅक्शन आणि कॉमेडी सर्वच जॉनरमध्ये जबरदस्त आणि त्या काळातल्या स्टायलिश अभिनेत्यांपैकी एक असलेले धर्मेंद्र नेहमीचं त्याच्या चाहत्यांशी आदराने वागायचा.