Jawaharlal Nehru University : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांकडून तोडफोड

23 Nov 2025 15:41:09
Jawaharlal Nehru University
 
मुंबई : (Jawaharlal Nehru University) जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या केंद्रिय ग्रंथालयात नव्याने लावण्यात आलेल्या फेशियल रिकग्निशन एक्सेस सिस्टम (एफआरएस) जेएनयूएसयू या डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांकडून लाल सलामच्या घोषणा देत तोडण्यात आले. विद्यापीठ विद्यार्थ्यांवर नोंदणी करण्याचा दबाव टाकत असल्याचा आरोप डाव्या संघटनांनी केला. शेकडो विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात घुसत उपकरणांची तोडफोड केली ज्यामध्ये फेशियल रिकग्निशन एक्सेस सिस्टम तोडून टाकण्यात आली. (Jawaharlal Nehru University)
 
डाव्या संघटनांनी आरोप केला की, आम्ही विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची नोंदणी करू नये यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासनाला सांगत आहोत मात्र प्रशासनाने तरीही जबरदस्तीने फेशियल रिकग्निशन एक्सेस सिस्टम लावली. (Jawaharlal Nehru University)
 
हेही वाचा :  "राज्यस्तरीय शालेय रग्बी क्रीडा" स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात
 
अशा प्रकारची सिस्टीम लावल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून स्वागत करण्यात आले. परिषदेने सांगितले की, विद्यापीठात (Jawaharlal Nehru University) येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी झाली पाहिजे. नोंदणी नसल्याने विद्यापीठाबाहेरील अनेक विद्यार्थी विद्यापीठातील सोईसुविधांचा लाभ घेत आहेत. परिषदेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डाव्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या तोडफोडीचा व्हिडिओ शेअर करत निंदा करण्यात आली. (Jawaharlal Nehru University)
 
परिषदेने त्यांच्या पोस्टमध्ये लिहले आहे की, डाव्यांनी केलेले कृत्य निंदनीय आहे. डाव्यांकडून शिक्षणाव्यतिरीक्त अन्य कामांसाठीच केंद्रिय ग्रंथालय अड्डा बनवण्यात आले होते. आता प्रशासनाने शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोकळी जागा मिळावी आणि विद्यार्थ्यांना शांततेत अभ्यास करता यावा यासाठी फेशियल रिकग्निशन एक्सेस सिस्टम लावली. डाव्या संघटनांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे की, त्यांना खरोखरच विद्यार्थ्यांच्या समस्यांविषयी तळमळ आहे की, बाहेरच्या अनधिकृत लोकांसाठी हा प्रकार चालू आहे. (Jawaharlal Nehru University)
 
हे वाचलात का ? :  TET Exam : TET पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; कोल्हापूरातून ९ जणांना अटक
 
डाव्या गटांनी नव्याने उभारलेल्या फेस रेकग्निशन गेटची तोडफोड केल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय आला. अभाविप जेएनयूकडून या कृत्याचा तीव्र निषेध केला असून हा शैक्षणिक वातावरण, शिस्त आणि परिसराच्या सुरक्षेवरील हल्ला आहे. अभाविप गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करते आणि विशेषतः परीक्षा जवळ येत असताना ग्रंथालय सुविधा वाढवण्याचे आवाहन प्रशासनाला करते. विद्यार्थ्यांचे हक्क आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत, शांततामय आणि अभ्यासास अनुकूल परिसरासाठी काम करत राहण्याचा अभाविपचा निर्धार आहे. (Jawaharlal Nehru University)
- तान्या कुमारी, अध्यक्ष अभाविप जेएनयू
 
विद्यापीठ प्रशासनाने ग्रंथालयाबाहेर चेहरा ओळखण्याचे यंत्र बसवले. त्यानंतर डाव्या विचारसरणीच्या गुंडांनी व्यवस्थेची लाजिरवाणी नासधूस करून पुन्हा एकदा त्यांच्या सवयीच्या गुंडगिरीचा अवलंब केला. ही तोडफोड केवळ सार्वजनिक मालमत्तेची नासधूस नाही तर जेएनयूच्या शैक्षणिक वातावरणावर, संस्थात्मक शिस्त आणि परिसराच्या सुरक्षेवर हल्ला आहे. हिंसा हा कोणत्याही समस्येवरचा तोडगा नाही. जेएनयू नेहमीच वादविवाद, संवाद आणि विचारविनिमयासाठी जागा राहिली आहे आणि अशी कृत्ये त्याच नैतिकतेचा अपमान आहेत. विद्यापीठ प्रशासनाने त्वरित आणि कठोर कारवाई करावी. (Jawaharlal Nehru University)
- प्रवीण कुमार पियुष, सचिव अभाविप जेएनयू
  
जेएनयू वगळता देशातील सर्वच मोठ्या विद्यापीठांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विजय झाला आहे. देशातील सर्वच विद्यापीठे डाव्यांच्या हिंसक वृत्तीला कंटाळले आहेत. अलिकडेच जेएनयूमध्ये करण्यात आलेली तोडफोड हा त्यांच्या विचारसरणीचाच एक भाग आहे. लाल सलामच्या घोषणा देत तोडफोड करण्यात आली. आज जगातून आणि देशातून साम्यवाद संपला आहे, येणाऱ्या काही काळात तो जेएनयूमधून देखील संपला जाईल. (Jawaharlal Nehru University)
- केतन शेंडगे, कार्यकारिणी सदस्य, अभाविप, पश्चिम महाराष्ट्र प्रांत
 
 
Powered By Sangraha 9.0