नागपूर : (Devendra Fadnavis) "ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तक वाचन आवश्यक आहेत. ए. आयच्या जमान्यात शॉर्ट कट ने आपल्याला सगळी माहिती मिळते. पण वाचल पाहिजे वाचन संस्कृती तयार झाली पाहिजे.यादृष्टीने पुस्तक महोत्सव खूप महत्त्वाचा आहे.यातून एक मोठ मंथन होईल."असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रविवार दि.२३ रोजी नागपूर येथे केले.
हेही वाचा : Devendra Fadnavis : २६/११ चा हल्ला झाला तेव्हाच प्रत्युत्तर देणे गरजेच होत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि.२३ रोजी नागपूर येथे 'नागपूर पुस्तक महोत्सव-२०२५' अंतर्गत होणाऱ्या 'झिरो माईल लिट फेस्टिव्हल'चे उदघाटन संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुस्तकांच्या विविध स्टॉल्सची पाहणी केली तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेखणीतून सिद्ध 'एग्जाम वॉरियर्स' या पुस्तकाच्या प्रतींचे वाटप केले. (Devendra Fadnavis)
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, "नागपूर हे एकमेव शहर आहे ज्या ठिकाणी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांची सेवा होताना पाहायला मिळत आहे.