Devendra Fadnavis : २६/११ चा हल्ला झाला तेव्हाच प्रत्युत्तर देणे गरजेच होत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

23 Nov 2025 18:28:43
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) "२६/११ चा हल्ला झाला तेव्हाच प्रत्युत्तर दिलं असतं तर परत हल्ला करायची हिंमत झाली नसती. त्या दहशतवादी घटनेचा परिणाम आजही आहे.पहलगाम येथे निष्पाप नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली. ज्या प्रकारे आपल्या देशात दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न झाला, त्या सर्व घटना आपण विसरता कामा नयेत. प्रत्येक भारतीयाने सजग, जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. " अस विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) यांनी शनिवार दि.२२ रोजी मुंबई येथे बोलताना केले.
 
हेही वाचा :  ameet satam : मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना फेसबुकवर व्हिडीओ शेअर करत धमकी!
 
दिव्यज फाउंडेशनच्या वतीनं दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या आणि पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांना सन्मानित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे दिव्यज फाउंडेशनच्या वतीने आयोजित 'ग्लोबल पीस ऑनर्स - २६/११चे शूरवीरांचे आणि पहलगाम हल्ल्यातील पीडितांचे स्मरण' कार्यक्रम शनिवार दि.२२ रोजी संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'शहीदांना वंदन करणारा' कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अमृता फडणवीस आणि दिव्यज फाउंडेशनचे अभिनंदन केले.या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा.एन आय ए डायरेक्टर जनरल सदानंद दाते,एन एस जी कमांडो सुनील जोधा, अंबानी कुटुंबीय,अभिनेता शाहरूख खान, टायगर श्रॉफ, शंकर महादेवन यास मान्यवर उपस्थित होते. (Devendra Fadnavis)
 
हे वाचलात का ?: Smriti Mandhana : स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका, आज होणारा लग्नसोहळा स्थगित
 
"२६/११ चा हल्ला हा केवळ ताज आणि ट्रायडंटवर नव्हता. मुंबई या भारताच्या आर्थिक सामर्थ्यालाच लक्ष्य करत हा हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला भारताच्या सार्वभौमत्वावर होता. 'ऑपरेशन सिंदूर' सारखी कठोर भूमिका तेंव्हा घेतली असती, तर आज पुन्हा भारतावर हल्ला करण्याची हिंमत कोणी केली नसती." असेही फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis)
 
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमृता फडणवीस आणि त्यांच्या दिव्यज फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले. (Devendra Fadnavis)
 
 
Powered By Sangraha 9.0