मुंबई : (Arnav Khaire) भाषा, प्रांताच्या आधारे समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना सद्बुद्धी द्या, अशी प्रार्थना भाजपच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात करण्यात आली.
मराठी तरुण दिवंगत अर्णव खैरे (Arnav Khaire) याने रेल्वेमध्ये भाषेवरून झालेल्या मारहाणीच्या धक्क्यामुळे आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभरात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर समाजात भाषावाद आणि प्रांतवादाच्या आधारावर विष पसरविण्याचे राजकारण काही राजकीय पक्षांकडून केले जात असल्यामुळे भाजपकडून त्याचा निषेध करण्यात आला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ 'सद्बुद्धी द्या' अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. अतुल भातखळकर, आ. प्रसाद लाड, मुंबई सरचिटणीस गणेश खणकर, आचार्य पवन त्रिपाठी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Arnav Khaire)
हेही वाचा : Jawaharlal Nehru University : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांकडून तोडफोड
याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना आ. अमीत साटम म्हणाले की, "अर्णव खैरे (Arnav Khaire) नावाच्या १९ वर्षाच्या मराठी युवकाला रेल्वेमध्ये मारहाण झाली. त्यामुळे त्याची मनस्थिती खच्ची झाल्याने त्याने घरी जाऊन आत्महत्य केली. काही राजकीय व्यक्ती आणि पक्ष भाषा, प्रांत याच्या आधारे समाजात तेढ निर्माण करण्याचे राजकारण करत आहेत. स्वत:चे संपलेले राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरिता प्रक्षोभक विधाने करत आहेत. लोकांची माथी भडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. याचाच एक परिणाम म्हणून रेल्वेमध्ये झालेल्या या घटनेने मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. अशा प्रकारचे राजकारण करणारे राजकीय पक्ष आणि राजकीय व्यक्तींना सद्बुद्धी मिळावी, अशी आमची प्रार्थना आहे. 'हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे' या मराठी गीताप्रमाणे भाषा, प्रांत असा भेद विसरून सर्वांनी एकत्र राहावे. मराठीचा कैवार घेणाऱ्या लोकांनी हे गीत ऐकावे आणि त्यातून काहीतरी शिकावे, अशी आमची ईच्छा आहे." (Arnav Khaire)
लोकांची माथी भडकवण्याचे काम करू नये
"आपण केलेले काम आणि विकासाच्या आधारावर किंवा भविष्यात आम्ही मुंबईकरांना काय देणार, याच्या आधारे लोकांना मते मागावीत. लोकांची माथी भडकवण्याचे काम करू नये. भाषा, प्रांताच्या आधारे समाजात तेढ निर्माण करु नये. मुंबई शहराच्या सामाजिक बांधिलकीला धक्का पोहोचवण्याच्या सर्व प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो. काही राजकीय पक्ष आणि व्यक्तींना सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर करणार आहोत. याप्रकरणाl पोलिस तपास करतील. दोषींना शिक्षाही होईल. परंतू, त्यामुळे अर्णव खैरे (Arnav Khaire) हा मुलगा आपल्या आईवडिलांना परत मिळणार नाही. ही घटना वेदनादायी आहे. अशी घटना भविष्यात पुन्हा घडू नये, यासाठी आमचा छोटा प्रयत्न आहे," असे ते म्हणाले.
हे वाचलात का ?: "राज्यस्तरीय शालेय रग्बी क्रीडा" स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात
दुटप्पी भूमिकेचा निषेध
"याच शिवाजी पार्कमध्ये जनाब जावेद अख्तर यांनी हिंदीत भाषण केले, यांची मुले जर्मन आणि फ्रेंच शिकतात ते यांना चालते. अशी दुटप्पी यांची भूमिका असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. १९९७ ते २०२२ मध्ये मुंबई महापालिका कुणी लुटली? कुणी खाल्ली? मुंबई महापालिकेत बसून कुणी भ्रष्टाचार केला हे संपूर्ण देशाला माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणूकीत कुणाला एकत्र यायचे किंवा नाही हा त्यांचा प्रश्न आहे. ते महत्त्वाचे नाही. गेल्या ११ वर्षात मुंबई शहराचा विकास कुणी केला हे महत्वाचे आहे. सामना वृत्तपत्राचा खप आणि वाचक किती आहेत ते सर्वांना माहिती आहे. त्यामुळे स्वत:चे संपलेले राजकारण जिवंत ठेवण्यासाठी रोज अशा प्रकारे वृत्तपत्रातून फेक नरेटिव्ह पसरवत असतात," असेही अमीत साटम म्हणाले. (Arnav Khaire)
"अर्णव खैरे हा एक युवा होता. त्याचे आणि त्याच्या परिवाराचे काही स्वप्न होते. त्याची काहीही चूक नव्हती. ट्रेनमध्ये तो जे काही बोलला त्यावरून राजकीय द्वेष पसरवणाऱ्या लोकांनी निवडणुकीसाठीचा मुद्दा समजून त्याला इतके छळले की, त्याने घरी जाऊन आत्महत्या केली. ही घटना खूप खेदाची आहे. या प्रकरणातील दोषींवर पोलिसांनी कारवाई करावी आणि ज्यांनी अशा प्रकारचे वातावरण तयार केले त्यांना ईश्वर सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना आम्ही केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळावर जाऊन प्रार्थना केली. निवडणुका जवळ आल्या की, काही लोक मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण करतात." (Arnav Khaire)
- मंगलप्रभात लोढा, कॅबिनेट मंत्री